पिंपरीत अभियंता तरूण पिस्तुल विक्री रॅकेटमध्ये, सात पिस्तुल जप्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:22 PM2018-08-29T17:22:44+5:302018-08-29T17:42:18+5:30

अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन लेबर सप्लायचा व्यवसाय करणारा अनुप सोनवणे हा तरूण गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय झाला आहे.

engineer's youth inclued in pistol sales racket, seven pistols seized | पिंपरीत अभियंता तरूण पिस्तुल विक्री रॅकेटमध्ये, सात पिस्तुल जप्त  

पिंपरीत अभियंता तरूण पिस्तुल विक्री रॅकेटमध्ये, सात पिस्तुल जप्त  

Next
ठळक मुद्देविनयभंग आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल १ लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत

पिंपरी : निगडी ओटास्किम येथील रहिवासी असलेला अनुप नवनाथ सोनवणे (वय. २८) हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला तरूण गुन्हेगारीकडे वळला असुन तो चक्क पिस्तुल विक्रीच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा साथीदार अवधूत जालिंदर गाढवे हा हॉटेल व्यवसायिक असून गुन्हेगारी कृत्यांत आघाडीवर आहे. या दोघांकडे विक्रीसाठी आणलले देशी बनावटीचे सात पिस्तुल आणि १५ काडतुसे आढळुन आली. १ लाख ९७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. दोघांचीही यापुवीर्ची गुन्हेगाारी पार्श्वभूमी आहे. अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुकत मकरंद रानडे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
अतिरिकत आयुक्त रानडे म्हणाले, अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन लेबर सप्लायचा व्यवसाय करणारा अनुप सोनवणे हा तरूण गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय झाला आहे. त्याच्यावर विनयभंग आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोंगर किनी गावचा आहे. त्याच्या निगडी येथील घराची झडती घेतली असता चार पिस्तुल आणि ८ जिवंत काडतुसे आढळुन आली. त्याच्याकडे अधिक चौकशीत त्याने मोशी येथील अवधुत जालिंधर गाढवे या साथीदाराचे नाव सांगितले. त्यास पिस्तुल विक्री केल्याची कबुली दिली. अनुपला ३१ आॅगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अनुपने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा साथीदार अवधूतला आळंदी परिसरातून ताब्यात घेतल्यावर त्याने अनुप कडून दोन पिस्तुल खेरदी केल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर आळंदी केळगावजवळ पिस्तुलाची चाचणी घेतल्याचेही नमूद केले. जालिंधरचा हॉटेल आणि लॉजिंगचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर यापुवीर्ही खंडणीचा गुन्हा दाखल आहे. आणखी एका खंडणीच्या गुन्ह्यात तो फरार आरोपी होता. ताब्यात घेतल्यानंतर त्यास २८ आॅगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. त्यास खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग करून अटक केली आहे. 
 गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गनु्हे शाखेचे पोलीस निरीक ब्रम्हानंद नायकवाडी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, दिपाली मरळे, पोलीस हवालदार वेताळ, कैलास बाबडे,प्रमोद लांडे,राजेंद्र शेटे,प्रविण दळे, राजेश परंडवाल,आप्पासाहेब कारकुउ, महादेव धनगर, दिलीप लोखंडे, अमित गायकवाड, तानाजी गाडे, संतोष बर्गे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 

Web Title: engineer's youth inclued in pistol sales racket, seven pistols seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.