‘द्रुतगती’वर केले प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:05 AM2018-11-13T00:05:06+5:302018-11-13T00:05:29+5:30
उर्से टोलनाका : परराज्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार
वडगाव मावळ : अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी परराज्यांतील विद्यार्थ्यांनी द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्यावर वाहनचालकांना सोमवारी प्रबोधन करून माहिती दिली. महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दादासाहेब शेळके, औरंगाबादचे पोलीस निरीक्षक सुरेश वानखेडे, सोलापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्यासह अरुणाचल, आसाम, मेघालय, नागालॅँड, मणिपूर या ठिकाणचे विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांनी द्रुतगती महामार्गावर वाहनचालकांना सीट बेल्ट लावणे, हेल्मेट घालणे या विषयी माहिती दिली. सामाजिक काम करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेतली. त्यानुसार सोमवारी या विद्यार्थ्यांना एक तास प्रशिक्षण दिले.
त्यानंतर द्रुतगती महामार्गावर सर्व लेनवर थांबून वाहनचालकांना माहिती दिली. महामार्गाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले, ‘‘द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्यावरून दररोज सुमारे ४० हजार वाहने जातात. अपघाताला आळा बसावा, यासाठी स्पीडगन मशिन लावल्या आहेत. अतिवेगात जाणाऱ्या शंभर चालकांवर तीन महिन्यांत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी चालकाने सीटबेल्ट लावणे आवश्यक आहे. यासाठी चालकांना या विद्यार्थ्यांकडून माहिती देण्यात आली.’’ विद्यार्थी माहिती देत असताना शिवसेनेच्या नेत्या नीलम गोºहे मुंबईला निघाल्या होत्या. त्यांनी थांबून या मोहिमेची माहिती घेतली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. दु्रतगती मार्गावर होणारे अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. काळजी घेतल्यास हे अपघात रोखता
येतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रबोधनाचा कार्यक्रम हाती घेतला. महामार्गावरून दररोज चाळीस हजार वाहने जातात. वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात आले.