सिमेंटच्या जंगलात शेतीतून पुरेसे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 01:37 AM2018-12-24T01:37:36+5:302018-12-24T01:37:58+5:30

गेल्याकाही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरांचाही झपाट्याने विकास झाला. त्याच वेगाने येथील शेती व्यवसाय संपुष्टात आला.

 Enormous yield from the farm in city | सिमेंटच्या जंगलात शेतीतून पुरेसे उत्पन्न

सिमेंटच्या जंगलात शेतीतून पुरेसे उत्पन्न

Next

रहाटणी : गेल्याकाही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरांचाही झपाट्याने विकास झाला. त्याच वेगाने येथील शेती व्यवसाय संपुष्टात आला. शेतीपेक्षा बांधकाम आणि इतर व्यवसायात अमाप पैसा मिळू लागल्याने अनेक शेतकरी इतर व्यवसायांकडे वळले आहेत. मात्र पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब काटे वयाच्या ६६व्या वर्षीही जोमाने शेती करतात.

बाळासाहेब काटे स्वत: शेतीकाम करतात. त्यामुळे कुठले पीक कधी घ्यावे याची त्यांना जाण आहे. त्यांनी सुमारे सात एकर जमिनीवर ज्वारी, हरभरा, वांगी, कांदा, मेथी, कोथिंबीर, लसूण, भेंडी, तर २५० कडीपत्त्याची व २५० लिंबाची झाडे लावली आहेत. या पिकातून त्यांना पुरेसे उत्पन्न मिळत आहे. परिसरातील नागरिक या शेतीला भेट देत आहेत. व्यापारी शेताच्या बांधावर माल खरेदी करतात. रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरवसह परिसरात १९९० पर्यंत शेती हाच मुख्य व्यवसाय होता. शेतीशिवाय पर्याय नव्हता. मात्र महापालिकेत समावेशानंतर समाविष्ट गावांतील या शेती व्यवसायाला हळूहळू उतरती कळा लागली. वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम व्यावसायिकांचा डोळा येथील शेतीवर फिरू लागला. अनेक शेतकऱ्यांनी पैशांच्या मोहापायी शेतजमिनी विकल्या. काहींनी जिल्ह्याच्या बाहेर जमिनी घेतल्या; मात्र ते पुन्हा शेतकरी झाले नाहीत. हळूहळू येथील शेतजमिनी कमी झाल्या. तेथे गगनचुंबी इमारती उभ्या आहेत. मात्र काही शेतकरी अद्यापही आपला पारंपरिक व्यवसाय म्हणून शेतीच करताना दिसून येत आहेत. त्यांपैकीच एक बाळासाहेब काटे आहेत.

जमीन विकून इमारती उभ्या करण्यापेक्षा शेतीचा व्यवसाय आमच्यासाठी उत्तम असल्याचे काटे यांनी सांगितले. शेतमजूर मिळत नसल्याने ते आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती करीत आहेत. माणसाशिवाय पर्याय नाही तेथे ते स्वत: काम करतात. शेवगा, कडीपत्ता, लिंब यावर काटे यांनी भर दिला आहे. पालेभाज्या, गहू, बटाटा, ज्वारी यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. आधुनिक पद्धतीने शेती करीत असल्याने उत्पन्न त्याच पटीत मिळत असल्याचे काटे यांनी सांगितले.

Web Title:  Enormous yield from the farm in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती