मतदारराजाचा उत्साह

By admin | Published: February 22, 2017 02:52 AM2017-02-22T02:52:35+5:302017-02-22T02:53:28+5:30

जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी, तर पंचायत समितीच्या १० गणांसाठी मंगळवारी मावळात सरासरी ८० टक्के

The enthusiasm of the voters | मतदारराजाचा उत्साह

मतदारराजाचा उत्साह

Next

वडगाव मावळ : जिल्हा परिषदेच्या ५ गटांसाठी, तर पंचायत समितीच्या १० गणांसाठी मंगळवारी मावळात सरासरी ८० टक्के मतदान झाले. ६४ उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मशिनमध्ये बंद केले. तालुक्यात १ लाख ३७८ मतदार असून यामध्ये ९३ हजार ३५३ पुरुष तर ८४ हजार २५ महिला मतदार आहेत. ३.३० वाजेपर्यंत तालुक्यात ९८३८२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सकाळी ७.३० वाजता अतिशय संथ गतीने सुरु झालेले मतदान ११ वाजता काहीसे वेगाने सुरु झाले. मतदार उशिरा येण्यास सुरुवात झाल्याने काही मतदान केंद्रावर सायंकाळी ७पर्यंत रांगा पाहायला मिळाल्या. याउलट शहरी भागात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांची गर्दी दिसून येत होती. ग्रामीण भागात तुरळक गर्दी पहावयास मिळाली. तालुक्यात सकाळी ९.३० वाजेपर्यंत ९.५५ टक्के मतदान झाले. यानंतर मतदार राजा बाहेर पडल्यामुळे साडेअकरा वाजेपर्यंत २३.९३ टक्के मतदान झाले होते. दुपारी १.३० वाजेपर्यंत ४०.५१ टक्के , ३.३० वाजेपर्यंत ५५.७८ टक्के मतदान पार पडले.
मतदारांकडून मतदान करवून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ दिसून येत होती. चारच्या पुढे मात्र कार्यकर्त्यांनी मतदारांना घरातून बाहेर काढण्यास सुरुवात केल्यामुळे मतदारांचा जोर काहीसा वाढलेला दिसला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. सगळीकडे मतदान शांततेत पार पडले. ग्रामीण भागात उमेदवारांनी मतदारांना घरपोच आणण्यासाठी वाहने पाठवल्याचे चित्र दिसत होते.
तालुक्यात सर्वांत प्रतिष्ठेची लढत असलेल्या वडगाव-खडकाळा गटात पोलिसांनी संवेदनशील केल्याने मोठ्या प्रमाणत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यात एकूण २१६ केंद्रांवर मतदान पार पडले. तालुक्यातील ३ मतदान केंद्रांना आदर्श मतदान केंद्र घोषित करण्यात आले होते.
या मतदान केंद्रावर पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. मतदारांनी मतदानासाठी दुपारी उशिरा येणे पसंत केल्यामुळे सायंकाळी साडेसातपर्यंत मतदान केंद्रावर लांबच लाब रांगा दिसत होत्या. यामध्ये वडगाव गणामध्ये ७०.२२ टक्के मतदान झाले. खडकाळा गणामध्ये ७२.१३ टक्के मतदान पार पडले. (वार्ताहर)

मतदान केंद्रात मोबाईलचा सर्रास वापर
 तालुक्यातील अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेले नागरिक मतदान करताना मशीन मध्ये आपण कोणत्या उमेदवाराला मतदान करत आहोत कोणते बटन दाबत आहेत याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करत असताना आढळल.े हे मतदार लगेच तो फोटो सोशल मीडियावर देखील फिरवत होते. यावेळी मतदान केंद्रात अधिकारी काय करत होते?अशा मतदारांना त्यांनी रोखले का नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केले.

Web Title: The enthusiasm of the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.