रिक्षाचालकाचा पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:25 AM2018-03-27T02:25:33+5:302018-03-27T02:25:33+5:30

शहरी भागात वाहनांमुळे सर्वाधिक वायू प्रदूषण होत असून, त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रदूषणाच्या या अनियंत्रित दुष्टचक्रामुळे व्यथित झालेल्या येथील एका

Environmental awareness program of autorickshaw driver | रिक्षाचालकाचा पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम

रिक्षाचालकाचा पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम

Next

तळेगाव दाभाडे : शहरी भागात वाहनांमुळे सर्वाधिक वायू प्रदूषण होत असून, त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रदूषणाच्या या अनियंत्रित दुष्टचक्रामुळे व्यथित झालेल्या येथील एका रिक्षाचालकाने पर्यावरणाच्या संतुलनासाठी खारीचा वाटा उचलण्याची नामी शक्कल लढविली आहे. प्रत्येक वाहनचालकाने जर त्याचे अनुकरण केले. तर रस्त्यावरील प्रदूषणाच्या विळख्यातून दिलासा मिळेल व पर्यावरणपूरक कामाचा योग साधता येईल.
शहराचे नागरीकरण झपाट्याने होत असताना येथील पर्यावरणावर गंडांतर येऊ लागले आहे. विकासाच्या रेट्यात येथील वृक्ष व जीवसंपदेवर धोक्याची घंटा वाजत आहे. वाहनांची संख्याही वाढते आहे. नगरपालिका, सरकार, नेते मंडळी आणि संस्था काय करतात यापेक्षा आपण स्वत: काय केले पाहिजे, या भावनेने सुनील सदाशिव चौरे या रिक्षाचालकाने त्यांच्या रिक्षा व्यवसायाला
पर्यावरण बांधिलकीची जोड देत पाणी बचत आणि
पर्यावरण संवर्धनासाठी
जनजागृती होईल, असा सहजयोग साधणारी क्लृप्ती केली आहे. चौरे यांची एमएच-१४ जीसी १८१३ ही प्रवासी रिक्षा सध्या प्रवाशांना सुखानंदाचा अनुभव देत असून, शहरातील आकर्षणाचे वाहन म्हणून कुतूहलाचा विषय झाली आहे.
पर्यावरणाचा संदेश देणारी ही रिक्षा सजली आहे़ ती कुंडीतील टवटवीत रोपांनी आणि शेजारी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय आणि डस्टबीनही. त्याच्या बाजूला लावलेली वृक्षवल्ली जतनाची आणि पाणी बचतीचा संदेश देणारे संदेश फलक.

Web Title: Environmental awareness program of autorickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.