बिल भरूनही ग्राहकांना ‘शॉक’, देयके भरूनही अनेक जणांचा खंडित केला वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:28 AM2018-03-14T01:28:58+5:302018-03-14T01:28:58+5:30
वीज बिलाची वसुली करण्यासाठी सध्या महावितरण कंपनी आक्रमक झाली आहे. मात्र वीजबिल वाटपात सावळा गोंधळ असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत.
चिंचवड : वीज बिलाची वसुली करण्यासाठी सध्या महावितरण कंपनी आक्रमक झाली आहे. मात्र वीजबिल वाटपात सावळा गोंधळ असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. बिले भरूनही विद्युत प्रवाह खंडित करणे अथवा बिल भरल्याची शहानिशा न करता वीजतोड करण्याचा सपाटा सध्या चिंचवडमधील महावितरण कार्यालयाने सुरू केला आहे. परीक्षेच्या काळात या कारवाईची मोहीम अधिक तीव्र झाल्याने अनेक ग्राहक संतप्त झाले आहेत. कारवाईत तत्पर असणारे अधिकारी व कर्मचारी नियोजनात मागे पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
मंगळवारी सकाळी चिंचवडमधील महावितरणच्या कर्मचाºयांना आदेश मिळताच परिसरातील बिल न भरलेल्या ग्राहकांचा विद्युतपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली. या वेळी अनेक ग्राहकांचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. उन्हाच्या त्रासाने त्रस्त झालेले व परीक्षेचा काळ असल्याने संतप्त झालेल्या ग्राहकांनी महावितरण कार्यालय गाठले.
या वेळी संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने अनेकांचा पारा चढला.
काहींनी बिल भरूनही विद्युतपुरवठा खंडित केल्याच्या तक्रारी केल्या. तर काहींनी बिल मिळाले नसल्याच्या तक्रारी मांडल्या. नियमित बिल भरत असूनही कोणतीही विचारपूस न करता वीजपुरवठा खंडित केल्याचे सांगितले.
काही वेळात हजर झालेल्या अधिकाºयांनी या ग्राहकांना वीजपुरवठा जोडण्याचा दंड ना घेता वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना कर्मचाºयांनी दिल्या. अनेकांना वेळेत बिल मिळत नसल्याने अडचणी येत असल्याचा तक्रारीवरून वाद झाले. विचारपूस न करता मुदतीनंतर दोन दिवसांतच कारवाई केल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला.
कारवाईत तत्पर असलेल्या अधिकाºयांनाही नियोजनातही तत्पर व्हावे अशा सूचना केल्या. सर्व सामान्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला. वीजबिल वाटपात गोंधळ असल्याने ही व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
>वीजचोरीवर नाही
नियंत्रण
नियमित बिले भरूनही आमचा विद्युतपुरवठा खंडित केला जातो. मात्र वीज चोरांवर महावितरण कंपनी कारवाई करत नाही. झोपडपट्टी भागात अनेकांनी आकडे टाकून वीज चोरी केल्याची बाब एका ग्राहकाने महावितरण अधिकाºयांना सांगितल्याने या अधिकाºयांचा पारा चढला. संबंधित अधिकाºयाने या ग्राहकाला तुम्ही झोपडपट्टीत राहायला जावा, असे उद्धट उत्तर दिल्याने ग्राहक व अधिकाºयांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. काही ग्राहकांनी आॅनलाइन बिल भरूनही पुरवठा बंद केल्याचे सांगितले. या प्रकारामुळे कार्यालयात गोंधळ निर्माण झाला.
>अधिकारी म्हणतात... : ग्राहकांना कार्यालयाकडून केले जाते सहकार्य
नियमाप्रमाणे आमचे कर्मचारी कारवाई करत असतात. बिल मिळाले नसल्यास ग्राहकाने कार्यालयातून बिल घेणे महत्त्वाचे आहे. बिलाबाबत काही तक्रारी असल्यास ग्राहक तक्रार अर्ज करू शकतात. आॅनलाइन पेमेंट जमा होण्यास उशीर झाल्यास अडचणी येतात. विद्युतपुरवठा खंडित केल्यानंतर अनेक ग्राहक तक्रारी करण्यासाठी नियमित येत असतात. त्यांना सहकार्य करण्याचे काम कार्यालयाकडून केले जाते. के. डी. जाधव, सहायक अभियंता
वेळेवर बिल मिळत नसल्याने अडचणी येतात. नियमित बिल भरत असूनही कोणतीही चौकशी न करता विद्युतपुरवठा खंडित केला जातो. मुलांच्या परीक्षा सुरू असल्याने याचा त्रास होतो. बिल भरले अथवा नाही याची चौकशी करणे महत्त्वाचे आहे. घरात कोणी नसताना अचानक वीजपुरवठा खंडित केला जातो. आज असाच प्रकार घडल्याने मी तक्रार करण्यासाठी कार्यालयात गेलो होतो. मात्र ग्राहकांना समाधान कारक उत्तरे मिळत नसल्याचा प्रकार आज पाहावयास मिळाला. - राहुल लुंकड, ग्राहक
विद्युतपुरवठा खंडित करण्यासाठी आज कर्मचारी घरी आले. आम्हाला बिलच मिळाले नसल्याने बिल भरले न्हवते. नियमित बिल भरत असतो. बिल भरण्याबाबत मेसेज जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र मला
बिलाची कॉपी मिळाली नाही.
नवीन बिल काढण्यासाठी कार्यालयात यावे लागते. आॅनलाइन पद्धत मी वापरत नसल्याने अडचणी येतात. या साठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.
- रोहित गोखले, ग्राहक