प्रत्येक व्यक्ती कर्तृत्वाने होते उत्तुंग
By admin | Published: September 8, 2016 01:14 AM2016-09-08T01:14:10+5:302016-09-08T01:14:10+5:30
प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तृत्वानेच उत्तुंग होते, त्या ज्ञानाचा सुगंध आपोआपच जगभर दरवळतो, असे मत मराठी विश्वकोषाच्या संपादिका डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे : प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तृत्वानेच उत्तुंग होते, त्या ज्ञानाचा सुगंध आपोआपच जगभर दरवळतो, असे मत मराठी विश्वकोषाच्या संपादिका डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब आॅफ तळेगाव दाभाडेतर्फे (कै.) श्रीमती सरुबाई ज्ञानोबा काळोखे यांच्या स्मरणार्थ व मातृदिन व शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श माता व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण वाड यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. वाड यांच्या गृहविष्णू या कथासंग्रहाचे प्रकाशन सीआरपीएफचे डीआयजीरो रामतीर्थ परमहंस यांच्या हस्ते करण्यात आले.
सोहळ्यात तळेगावातील सात मातांचा आदर्श माता पुरस्कार देण्यात आला. सायली जोशी, संगीता शिरसाट, सुख्मिणी सावंत, ऊर्मिला सरदार, कमल हरगापुरे, भारती लोहार, भामाबाई तोडकर या मातांचा सन्मान करण्यात आला. सहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. सुवर्णा गायकवाड (रामभाऊ परुळेकर विद्या निकेतन), सागर केंजूर (बालविकास हायस्कूल), सुरेखा रासकर (सरस्वती विद्यालय), सुनील मंडलीक (आदर्श हायस्कूल), जयश्री पावसे (लोकमान्य टिळक न.प. शाळा क्रमांक ३), शैला सरसर (कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल) या शिक्षकांचा सन्मान केला. सीआरपीएफचे डीआयजीरो परमहंस यांचाही तळेगावातील सीआरपीएफला देशभरात अव्वल नामांकन मिळाले यासाठी सन्मान करण्यात आला.
क्लबचे अध्यक्ष मंगेश गारोळे यांनी प्रास्ताविक केले. नीलिमा बारटक्के यांनी सूत्रसंचालन केले. महेश महाजन यांनी आभार मानले. अशोक काळोखे, विलास शहा, विलास जाधव, प्रसाद मुंगी, यादवेंद्र खळदे, संजय पटवा, अरुण बारटक्के व किरण परळीकर यांनी आयोजनात परिश्रम घेतले. (वार्ताहर)