दर मंगळवारी कोरडा दिवस
By admin | Published: November 1, 2014 11:13 PM2014-11-01T23:13:27+5:302014-11-01T23:13:27+5:30
बारामती शहर परिसरात डेंग्यूसारख्या कीटकजन्य व अन्य विषाणूजन्य आजारावर नियंत्रणासाठी सर्व पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत.
Next
बारामती : बारामती शहर परिसरात डेंग्यूसारख्या कीटकजन्य व अन्य विषाणूजन्य आजारावर नियंत्रणासाठी सर्व पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. डेंग्यू तापाची स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी दर मंगळवारी कोरडा दिवस पाळावा. त्याचबरोबर परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी केले आहे.
बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रतील डेंग्यु, हिवताप, चिकुनगनिया विषाणूजन्य आजारांच्या पाश्र्वभुमीवर बारामती नगराध्यक्ष सुभाष सेामाणी, मुख्याधिकारी दीपक ङिांझाड, आरेाग्य समितीचे ,सभापती जय पाटील, पंचायत समितीचे तालुका आरेाग्य अधिकारी डॉ. महेश जगताप, सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.बापू भोई,गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी बैठक घेऊन कीटकशास्त्रीय सव्रेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणात पाण्यात आढळून येणा:या डास,अळ्या शोधणो, असे असलेले पाणीसाठा त्वरित रिक्त करणो, किंवा टेमिफॉस या अळी नाशकाचा वापर करणो तसेच मोठय़ा पाणीसाठयात डास अळी भक्षक गप्पी मासे सोडणो या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती बारामती नगरपरिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. या निवेदनानुसार ऑगस्ट महिन्यात 6क् कर्मचा:यांमार्फत 15 हजार 7क्क् घरांना भेटी देण्यात आल्या. त्यापैकी 361 घरात आढळून आलेले डास तसेच अळ्या नष्ट करण्यात आल्या आहेत.तर बारामती नगरपरिषद, हिवताप उपपथक, बारामती व सिल्व्हर ज्युबिली शासकिय रूग्णालय,बारामती व बारामती नगरपरिषद आरेाग्य कर्मचारी, गिरीराज नर्सिग होम,शारदाबाई पवार नर्सिग होम विद्याथ्र्याचे पथक यांच्या सहकार्याने 14 पथकांमार्फ त सप्टेंबर महिन्यात दररोज 1क्क् घरी सलग 7 दिवस जाऊन सव्र्हेक्षण करण्यात आले. त्यात 1क्262 घरांचे सव्र्हेक्षण करण्यात येऊन 182 घरांत आढळलेल्या पुन्हा आढळून आलेल्या डासअळ्या नष्ट करण्यात आल्या.तर ऑक्टोबर महिन्यात संशयित रूग्ण असलेल्या भागातील 9653 घरांत प्रत्यक्ष भेटी देऊन 141 घरांमध्ये आढळून आलेल्या अळ्या नष्ट करण्यात आल्या. या सव्र्हेक्षणांनंतर परिसरात धूर फवारणी करण्यात येत आहे. डेंग्यु प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी 2क्,क्क्क् माहितीपत्रके वाटून जनजागृती करण्यात आली आहे. शहरामधून जाणा:या कालव्याचे परक्युलेशन होणा:या परिसरात टेमिफोसचा वापर , जळके ऑईल आदींचा उपाययोजना करण्याचे काम करण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या वतीने 28 ऑक्टोबरपासून दर मंगवारी कोरडा दिवस पाळणो तसेच डेंग्यू साथ रोगावर करावयाच्या इतर उपाय योजनांबाबतचे जाहिर आवाहन करण्यात आले आहे. तसेच क:हा नदीच्या पात्रतील पाण्याचा प्रवाह करण्यात आला आहे. या तापाबाबत आत्तापयर्ंत खासगी रुग्णालयांनी दिलेल्या आकडेवारीनुसार नगरपरिषद कार्यक्षेत्रत 43 रुग्ण डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण आढळून आलेले आहेत.
शहराची दैनंदिन स्वच्छता व नागरिकांच्या येणा:या दैनंदिन तक्रारी निवारण करण्यासाठी तक्रार रजिस्टर ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणो तक्रारींचे निवारण तत्पर करण्यात येत आहे. या सर्व उपाय योजनांमुळे डेंग्यू तापाची स्थिती नियंत्रणात आहे. तरी नागरिकांनी घाबरुन न जाता, दर मंगळवारी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, डेंग्यूसह अन्य कीटकजन्य आजारांच्या बाबतीत ‘लोकमत’ने उठविलेल्या आवाजानंतर बारामतीकरांनी नगरपालिका प्रशासनाकडे सार्वजनिक स्वच्छतेबाबत तक्रारी सुरू केल्या आहेत. याशिवाय पालिकेकडून धूर फवारणी केली जाते. या धूर फवारणीत डास मरण्यासाठी वापरण्यात येणा:या औषधांचे प्रमाण कमी असते. हे प्रमाण वाढवावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष संजय संघवी यांनी केली.
4सद्यपरिस्थितीत तुरळक रुग्ण उपचार घेत आहेत. सिल्व्हर ज्युबिली शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे डेंग्यू ताप, चिकुनगुन्या इत्यादी आजार झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र डॉक्टरांचे पथक स्थापन करण्यात आले आहे तसेच या रुग्णांकरिता स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.
4खबरदारीचा उपाय म्हणून आठ पथके घरोघरी भेट देण्यासाठी कार्यरत आहेत. सदर पथकांमार्फत किटकशास्त्रीय सर्वेक्षण, धुरळणी, स्प्रे पंप फवारणी, पावडर फवारणी करण्यात येत आहे तसेच आरोग्य शिक्षणही देण्यात येत आहे.