एक्साइजच्या पथकाचा गोव्यात छापा, देशी दारुच्या २१ लाखांच्या ६० हजार बाटल्या जप्त

By नारायण बडगुजर | Published: January 30, 2024 08:12 PM2024-01-30T20:12:12+5:302024-01-30T20:12:37+5:30

देशी दारुच्या २१ लाखांच्या ६० हजार बाटल्या जप्त

Excise's Pimpri team raids in Goa | एक्साइजच्या पथकाचा गोव्यात छापा, देशी दारुच्या २१ लाखांच्या ६० हजार बाटल्या जप्त

एक्साइजच्या पथकाचा गोव्यात छापा, देशी दारुच्या २१ लाखांच्या ६० हजार बाटल्या जप्त

पिंपरी : गोवा राज्यात जाऊन बनावट देशी दारूच्या कारखान्याचा राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज) विभागाने पर्दाफाश केला. यात देशी दारुच्या २१ लाखांच्या ६० हजार बाटल्या आणि १५ लाखांचा टेम्पो यासह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पुणे एक्साइजच्या ‘फ’ (पिंपरी) विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली.
 
झुल्फिकार ताज आली चौधरी (६८, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश), अमित ठाकूर आहेर (३०, रा. बोरमाळ, पारसवाडा, पो. कोचाई, ता. तलासरी, जि. पालघर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासह इतर दोघांवर देखील एक्साइजने गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. 

पुणे एक्साइजचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना मुंबई - पुणे महामार्गावर मामुर्डी परिसरात अवैध मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक्साइजच्या ‘फ’ (पिंपरी) विभागातर्फे सापळा लावला. त्यावेळी संशयित ट्रकची पाहणी केली असता गोवा राज्यात तयार झालेल्या बनावट देशी दारूच्या मद्याची ट्रकमधून अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे समोर आले. ट्रकमध्ये रॉकेट संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या ६० हजार बाटल्या (६०० खोके) मिळून आल्या. यात बनावट देशी मद्याचा २१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ट्रकमध्ये मिळला. यामध्ये १५ लाखांच्या वाहनासह ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी २३ जानेवारीला गुन्हा दाखल केला. 

जप्त बनावट देशी मद्य हे गोव्यातील वडावल येथे पत्र्याच्या गोडावूनमध्ये तयार केले जात असून त्याची विक्री महाराष्ट्रात होत असल्याचे समजले. त्यानुसार एक्साइजच्या पथकाने गोव्यात कारवाई केली. गोवा पोलिसांची मदत घेऊन उत्तर गोवा जिल्ह्यातील डिचोळी तालुक्यातील वडावल येथील बनावट देशीमद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा घातला. यात बनावट देशी मद्यासाठीचा एक लाख ३४ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल सीलबंद केला. या कारवाईत एकूण ३८ लाख १४ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. झुल्फिकार याला गुन्ह्याच्या ठिकाणी व अमित याला गोव्यात जाऊन तपासादरम्यान अटक केली.   

एक्साइजचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक्साइजचे निरीक्षक दीपक सुपे, सासवडचे निरीक्षक प्रवीण शेलार, रोहित माने, आर. एम. सुपेकर, डी. वाय. गोलेकर, शीतल पवार, नम्रता वाघ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Excise's Pimpri team raids in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.