पिंपरीतील खळबळजनक घटना! दहावी शिकलेला डॉक्टर एक वर्ष कार्यरत असल्याचे आले उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 10:59 AM2021-05-27T10:59:02+5:302021-05-27T10:59:19+5:30

बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

Exciting incident in Pimpri! It has been revealed that the tenth trained doctor has been working for one year | पिंपरीतील खळबळजनक घटना! दहावी शिकलेला डॉक्टर एक वर्ष कार्यरत असल्याचे आले उघडकीस

पिंपरीतील खळबळजनक घटना! दहावी शिकलेला डॉक्टर एक वर्ष कार्यरत असल्याचे आले उघडकीस

Next
ठळक मुद्देकेअर हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, ओएनपी लीला हॉस्पिटल, ऑनेक्स हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून नोकरी केल्याचे नमूद केले

पिंपरी: कोरोना महामारीत औषधांचा काळाबाजार होत असतानाच डॉक्टरही बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. बिजलीनगर येथील एका रुग्णालयात वर्षभर काम केलेल्या एका बोगस डॉक्टर वर पिंपरी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

अक्षय केशव नेहरकर (रा. बिजलीनगर चिंचवड), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल भास्कर काटकर (वय ४९, रा. वरळी, कोळीवाड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरकर याने कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना पदवी असल्याचे भासवले. वैद्यकीय कन्सल्टंट म्हणून नोकरी मिळवण्यासाठी आयसीआयसीआय जनरल इन्शुरन्स कंपनीस ई-मेलद्वारे रिझ्यूम पाठवला. त्यामध्ये बीएएमएस तसेच एमडी ॲपियर पदवी टाकून सिटी केअर हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, ओएनपी लीला हॉस्पिटल, ऑनेक्स हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून नोकरी केल्याचे नमूद केले. तसेच मुलाखती दरम्यान डॉक्टर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेदिक रिसर्च सेंटर पिंपरी-चिंचवड येथून पदवी घेतल्याचे सांगितले. पदवी प्रमाणपत्राची मागणी केली असता ते न दाखवता त्याने ओनेक्स हॉस्पिटल बिजलीनगर येथे सुमारे एक वर्षापासून डॉक्टर म्हणून नोकरी केली. 

त्यानंतर नवीन नोकरीच्या शोधात अक्षय नेहरकर याने आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स पिंपरी व पुणे विभाग यांच्या कार्यालयीन ईमेल आयडीवर ५ फेब्रुवारीला रिझ्यूम पाठवला. त्याला पिंपरी कार्यालयात मुलाखतीसाठी बोलावले. त्यावेळी तो पदवीची कागदपत्रे सादर करू शकला नाही. तसेच तो डॉक्टर म्हणून नोकरी करीत असलेल्या हॉस्पिटलमधून संबंधित इन्शुरन्स कंपनीकडे मोबदल्यासाठी अनेक प्रकरणे आली. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीला संशय आला. त्यांनी आरोपीच्या पदवीबाबत संबंधित संस्थेकडे विचारणा केली असता अशी पदवी दिली नसल्याचे २५ मे २०२१ रोजी निष्पन्न झाले. त्यानुसार इन्शुरन्स कंपनीचे विशाल काटकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. 

शिक्षण दहावी, नोकरी डॉक्टरची

अक्षय नेहरकर हा केवळ दहावीपर्यंत शिकला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच त्याने इंग्रजी शिकून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. इन्शुरन्स कंपनीच्या एका प्रतिनिधीचा नोंदणी क्रमांक मिळवून त्याआधारे त्याने काही जणांना इन्शुरन्स कंपनीकडून लाभ मिळवून दिल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

Web Title: Exciting incident in Pimpri! It has been revealed that the tenth trained doctor has been working for one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.