उद्योगनगरीतील पीएमपी बसच्या फेऱ्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 02:39 AM2018-11-02T02:39:18+5:302018-11-02T02:40:26+5:30

राहुल जाधव यांची माहिती; महापौरांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

Expansion of the PMP buses in the industry | उद्योगनगरीतील पीएमपी बसच्या फेऱ्यांत वाढ

उद्योगनगरीतील पीएमपी बसच्या फेऱ्यांत वाढ

Next

पिंपरी : महापालिकेतील नगरसदस्य, पदाधिकारी व पीएमपीच्या अधिकाºयांची नुकतीच बैठक घेण्यात आली. प्रवाशांची गैरसोय विचारात घेऊन नव्याने बससेवा सुरू करण्याबाबत व काही बस मार्गांचा विस्तार करण्याबाबत चर्चा झाली. त्यामध्ये शहरातील अनेक मार्गांवरील बसच्या फेºया वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

प्रवाशांना सोईस्कर व जलद प्रवास करता यावा यासाठी शहरातील मार्गांवर बसच्या फेºया वाढवण्यात आल्या आहेत. निगडी-देहू-निगडी ही बससेवा तळवडे व देहूरोडमार्गे सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर दहा बस सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे मनपा ते शिवसृष्टी चौक या बसचा जाधववाडी व चिखलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. भोसरी ते हिंजवडी ही बस वायसीएम रुग्णालय व थेरगावमार्गे सुरू करण्यात आली आहे. पिंपळे निलख ते निगडी ही बस विशालनगर, थेरगाव, चिंचवडमार्गे सुरू करण्यात आली आहे. तसेच सोमवारी (दि. ५) पिंपरीगाव ते हिंजवडी, माण फेज थ्री ही नवीन बस काळेवाडी, डांगे चौकमार्गे सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेवाळवाडी ते पिंपरी मनपा या बसचा पिंपरीगावापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. नव्याने सुरू केलेल्या बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले आहे.

Web Title: Expansion of the PMP buses in the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.