क्रीडा स्पर्धांसाठी होतोय लाखोंचा खर्च, महापौर चषक व्हॉलीबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 03:18 AM2017-12-11T03:18:12+5:302017-12-11T03:18:18+5:30

महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन, पुणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि चºहोली येथील श्री वाघेश्वर व्हॉलीबॉल संघ यांच्या सहकार्याने २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत महापौर चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे.

 Expenditure for millions of sports tournaments, Mayor trophy volleyball competition | क्रीडा स्पर्धांसाठी होतोय लाखोंचा खर्च, महापौर चषक व्हॉलीबॉल स्पर्धा

क्रीडा स्पर्धांसाठी होतोय लाखोंचा खर्च, महापौर चषक व्हॉलीबॉल स्पर्धा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन, पुणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि चºहोली येथील श्री वाघेश्वर व्हॉलीबॉल संघ यांच्या सहकार्याने २२ ते २५ डिसेंबर या कालावधीत महापौर चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी १९ लाख ७२ हजार ९२५ रुपयांचा खर्च येणार आहे.
स्पर्धांच्या खर्चासाठी अंदाजपत्रकात ३७ लाख ७९ हजार ४२५ रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने इतर स्पर्धा आयोजित करण्यासाठी या एका स्पर्धेकरिता एका संस्थेला ३७ लाख रुपये खर्च करणे उचित होणार नाही. त्यामुळे विविध संघटना मिळून ही स्पर्धा घेणार आहेत, असे याबाबतच्या ठरावात म्हटले आहे.
पालिकेच्या क्रीडा धोरणामध्ये महापौर चषक सांघिक राज्यस्तरीय खेळाच्या स्पर्धा आयोजन करणाºया संघटनांना दहा लाख रुपये देण्याची तरतूद आहे. मात्र, महापौर चषक राज्य अजिंक्यपद हॉलीबॉल स्पर्धेचे स्वरूप मोठे असून, ही स्पर्धा चार दिवस चालणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी पूना डिस्ट्रीक व्हॉलीबॉल असोसिएशन यांना १९ लाख ७२ हजार ९२५ रुपये देण्यात येणार आहेत.

व्हॉलीबॉल स्पर्धाही महापौरांच्याच प्रभागात!
महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आणि पिंपरी-चिंचवड जिल्हास्तरीय महापौर चषक अर्ध मॅरेथॉन स्पर्धाही महापौर नितीन काळजे यांच्या प्रभाग क्रमांक तीन चºहोलीतच घेण्यात आली होती. त्यानंतर आता महापौर चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धादेखील त्यांच्याच प्रभागात घेण्यात येणार आहे. त्यामुळे महापौर केवळ चºहोलीचे महापौर आहेत की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title:  Expenditure for millions of sports tournaments, Mayor trophy volleyball competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.