उद्योगनगरीने अनुभवला पुणेरी इरसालपणा, तिरकस भाष्याला मिळाली मनमुराद दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:38 AM2018-07-09T01:38:59+5:302018-07-09T01:39:40+5:30

औद्योगिकनगरीतील नागरिकांच्या आग्रहास्तव लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या वतीने पुणेरी पाट्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. रविवारी पहिल्याच दिवशी प्रदर्शनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अस्सल पुणेरी, खवचट व वात्रट पाट्यांचे प्रदर्शन सुरू झाले. पुणेरी स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती, इरसालपणा उद्योगनगरीने अनुभवला.

experience of Pune | उद्योगनगरीने अनुभवला पुणेरी इरसालपणा, तिरकस भाष्याला मिळाली मनमुराद दाद

उद्योगनगरीने अनुभवला पुणेरी इरसालपणा, तिरकस भाष्याला मिळाली मनमुराद दाद

Next

पिंपरी - औद्योगिकनगरीतील नागरिकांच्या आग्रहास्तव लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या वतीने पुणेरी पाट्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. रविवारी पहिल्याच दिवशी प्रदर्शनास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अस्सल पुणेरी, खवचट व वात्रट पाट्यांचे प्रदर्शन सुरू झाले. पुणेरी स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती, इरसालपणा उद्योगनगरीने अनुभवला.
चिंचवड येथील गंधर्व हॉलमध्ये लोकमत आयोजित कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स प्रस्तुत पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. सकाळपासूनच पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची प्रदर्शन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. मेन्स अ‍ॅव्हेन्यूच्या सहयोगाने भरविलेले प्रदर्शन को-पॉवर्ड बाय शिवसेना गटनेते राहुल कलाटे व राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज आणि आईस्क्रीम पार्टनर खत्री बंधू पॉट आईस्क्रीम व मस्तानी आहे. आउटडोअर पार्टनर धीरेंद्र आउटडोअर मीडिया सोल्युशन्स प्रा. लि.,
तर व्हेन्यू पार्टनर कर्तव्य फाउंडेशन आहे.
प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन सकाळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते झाले. प्रारंभी लोकमतचे संस्थापक-संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. या वेळी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, बांधकाम व्यावसायिक आर. डी. देशपांडे, केआरए ज्वेलर्सचे अतुल आष्टीकर, आकाश शेळके, राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेजचे प्रमुख अजय साळुंखे, मेन्स अ‍ॅव्हेन्यूचे अजित जैन, खत्री बंधू पॉट आईस्क्रीम मस्तानी संस्थेचे गिरीश खत्री, भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे उपस्थित होते.

उद्योगनगरीमध्ये प्रथमच झालेल्या पुणेरी पाट्या प्रदर्शनास उदंड प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम स्तुत्य आहे.
- अतुल आष्टेकर, केआरए ज्वेलर्स
पुणेरी पाट्या प्रदर्शनातून उद्योगनगरीतील नागरिकांना पुणेरी संस्कृतीचे दर्शन घडले.
- अजिंक्य बडवे, मेन्स अ‍ॅव्हेन्यू

लोकमतच्या या प्रदर्शनातून पुणेरी अभिमानाचे दर्शन घडले. प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाला. - अजय साळुंखे, राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज

पिंपरी-चिंचवडमध्ये लोकमतने आयोजित केलेल्या पुणेरी पाट्यांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. - गिरीश खत्री, खत्री बंधू पॉट आईस्क्रीम

४आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘‘आमच्या घरात एका खोलीतील दरवाजा हा कमी उंचीचा होता. त्याचे कारण म्हणजे एक सिमेंटचा बीम आला होता. त्यामुळे वडिलांनी त्या ठिकाणी कोणाचे डोके आपटून इजा होऊ नये, म्हणून तिथे मोठ्या अक्षरात लिहिले होते - डोके असेल तर वाका.’’ आयुक्तांच्या या वाक्यावर हास्यलाट उसळली.

पुणेरी पाटी आणि संस्कृती सर्वत्र प्रसिद्ध आहे. निखळ आनंद देणाऱ्या या पुणेरी पाट्या असून, विनोदी वृत्ती आणि मार्मिकपणा लक्षात येतो. पिंपरी-चिंचवडकरही पाट्यांमध्ये कमी नाहीत. त्याचेही एक प्रदर्शन होऊ शकते. लोकमतने पुणेरी पाट्यांचे प्रदर्शन भरवून इरसाल संस्कृतीचे दर्शन घडविले. त्याबद्दल लोकमतला धन्यवाद. - श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

निखळ आनंद देणाºया, खोचकपणे डोळ्यांत अंजन घालणाºया पुणेरी पाट्या असून, पिंपरी-चिंचवडकरांना पुणेरी संस्कृतीचा अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.
- अ‍ॅड. सचिन पटवर्धन,
अध्यक्ष, लोकलेखा समिती

पुणेरी पाट्या जगाभरामध्ये प्रसिद्ध आहेत. अशा पुणेरी संस्कृतीचे दर्शन लोकमतने घडविले. या प्रदर्शनाचा आस्वाद शहरवासीयांनी घ्यावा.
- राहुल कलाटे,
गटनेते, शिवसेना
 

Web Title: experience of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.