अंधश्रद्धेपोटी जनतेची पिळवणूक
By admin | Published: September 23, 2016 02:07 AM2016-09-23T02:07:22+5:302016-09-23T02:09:20+5:30
वाधर्माच्या उपासनेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध नाही़ मात्र, देवाधर्माच्या नावाखाली सामान्य नागरिकांची पिळवणूक आणि फ सवणूक करण्यास समितीचा विरोध
पिंपरी : देवाधर्माच्या उपासनेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध नाही़ मात्र, देवाधर्माच्या नावाखाली सामान्य नागरिकांची पिळवणूक आणि फ सवणूक करण्यास समितीचा विरोध असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी केले आहे़ चिंचवड येथे प्रतिभा महाविद्यालयात ‘प्रश्न विद्यार्थ्यांचे उत्तर मुक्ता दाभोळलरांचे’ हा उपक्रम समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता़ या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ राजेंद्र कांकरिया उपस्थित होते़
पुढे बोलताना दाभोलकर यांनी मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपण शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यासाठी अपयशी ठरत आहोत़ यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला पाहिजे़ तसेच भूत ही संकल्पना आजही समाजामध्ये अस्तित्वात आहे़ लग्नकार्यात पत्रिका पाहणे, मंगळ आहे, अशा अंधश्रद्धा पाळल्या जातात़ आपल्या देशाने मंगळावर यान पाठविले आहे़ पण, दुसरीकडे मंगळ असलेल्या मुलीबरोबर कोणी लग्न करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे़ समजात अजूनही जुन्या बुरसटलेल्या रूढी, परंपरांची अंमलबजावणी होत आहे. अनेकजण त्याच्या आहारी गेले आहेत. यासाठी जनजागृती करून समाजातील गैरसमज दूर केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले़
या वेळी अंनिसच्या राजीव देशपांडे, मिलिंद देशमुख, प्रभाकर नानावटी यांनी मनोगत व्यक्त केले़ कार्यक्रमात प्रज्ज्वल कुदाळ, किरण शेळके, रोशन इंगळे यांचा
विशेष सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ़ अरुण बुरांडे यांनी केले़ सूत्रसंचालन डॉ़ राजेंद्र कांक रिया यांनी केले़ तर आभार प्रदर्शन नंदिनी जाधव यांनी केले़(प्रतिनिधी)