औषधांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 10:39 PM2021-06-07T22:39:35+5:302021-06-07T22:40:36+5:30

अँटी फंगल या साथीच्या आजारावरील वापरण्यात येणाऱ्या औषधाची विक्री करण्यासाठी काहीजण वाकड येथे येणार असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती...

Exposing gangs who black of medicine; Filed a case against 5 persons | औषधांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

औषधांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

Next

पिंपरी : अँटी फंगल या साथीच्या आजारावरील इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. काळ्या बाजारात या इंजेक्शनच्या विक्रीप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुडा विरोधी पथकाने सोमवारी (दि. ७) ही कारवाई केली.

गौरव जयवंत जगताप (वय ३१, रा. काळाखडक रोड, वाकड), अमोल अशोक मांजरेकर (वय ३९, रा. सूसरोड, पाषाण, पुणे), गणेश काका कोतमे (वय ३२, रा. जनता वसाहत, पुणे) आणि एक महिला आरोपी (वय २४, रा. ज्ञानदीप शाळेजवळ, पालांडे यांच्या घरी, रुपीनगर, निगडी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह बसवराज (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भाग्यश्री अभिराम यादव (वय ४४, रा. धनकवडी, पुणे) यांनी सोमवारी (दि. ७) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटी फंगल या साथीच्या आजारावरील वापरण्यात येणाऱ्या औषधाची विक्री करण्यासाठी काहीजण वाकड येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्ता सुधीर हिरेमठ यांना मिळाली. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाने सापळा लावून चार जणांना अटक केली. ऍन्टी फंगलवरील इंजेक्शनचे तीन नग आरोपींकडे मिळून आले. त्यांनी हे औषध काळ्या बाजारात विक्रीसाठी आणले होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी चौघांना पकडले. 

गुंडा विरोधी पथकातील सहायक निरीक्षक हरीश माने, हजरत पठाण, गणेश मेदगे, शुभम कदम, राम मोहिते, विनोद तापकीर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Exposing gangs who black of medicine; Filed a case against 5 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.