Chinchwad By-Election | पक्षविरोधी कारवायांमुळे ठाकरे गटातील ८ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 03:54 PM2023-02-21T15:54:21+5:302023-02-21T15:56:31+5:30
पोटनिवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून हाकालपट्टी...
पिंपरी : चिंचवड मतदार संघात सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून शिवसेना (ठाकरे गट) मधून तब्बल आठ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. यासंदर्भात ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड. गौतम चाबूकस्वार यांनी आदेश दिले. पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये महिला चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, उपशहरप्रमुख नवनाथ तरस यांचा समावेश आहे.
चाबूकस्वार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना शिवसेना (ठाकरे गट) पक्षाने महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून पाठिंबा दिला. मात्र, काही पदाधिकारी पक्ष आदेशाविरोधात काम करत असल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.
कारवाई करण्यात आलेले पदाधिकारी पद
अनिता तुतारे - महिला चिंचवड विधानसभा संघटिका
रजनी वाघ - शहर संघटिका
शिल्पाताई आनपान - विभाग संघटिका
नवनाथ तरस - उपशहर प्रमुख
प्रशांत तरवटे - विभाग प्रमुख
गणेशआहेर - पिंपरी विधानसभा समन्वयक
रवी घटकर