पिंपरीत बांधकामे नियमितीकरणास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:03 PM2018-06-27T17:03:57+5:302018-06-27T17:14:29+5:30

बांधकामे नियमितीकरणास राज्याच्या नगर विकास विभागाने मुदतवाढ दिली आहे. १८ फेब्रुवारी २०१९ ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत असणार आहे.

Extension to the continuty construction works | पिंपरीत बांधकामे नियमितीकरणास मुदतवाढ

पिंपरीत बांधकामे नियमितीकरणास मुदतवाढ

Next
ठळक मुद्देजाचक अटी-शतीमुर्ळे बांधकामे नियमितीकरण प्रक्रियेला नागरिकांचा अल्प प्रतिसादअवैध बांधकामे नियमितीकरणासाठीची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध

पिंपरी : अवैध बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय राज्य सरकारने गेल्यावर्षी घेतला. त्यानुसार सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालखंडात केवळ २४ अर्ज आल्याने नियमितीकरणास राज्याच्या नगर विकास विभागाने मुदतवाढ दिली आहे. १८ फेब्रुवारी २०१९ ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत असणार आहे. बांधकामे नियमित करण्यासासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. 
राज्यभरातील डिसेंबर २०१५ पूर्वीची अवैध बांधकामे अधिकृत करण्याची अधिसूचना राज्य सरकारने जाहीर केली होती. त्यानुसार प्रारूप नियमावली गेल्यावर्षी ७ आॅक्टोबरला जाहीर केली. त्यास महाराष्ट्र टाऊन प्लॅनिंग (एकत्रित संरचना) नियम २०१७ असे म्हटले होते. त्यात कोणती अवैध बांधकामे अधिकृत करायची व कोणती नाहीत, याबाबतचे स्पष्ट निकष प्रसिद्ध केले होते. त्यानुसार डिसेंबर २०१५ पूर्वीच्या अवैध बांधकामांनाच अधिकृत करणे, नद्या, कालवे, पूररेषा, रेडझोन, ऐतिहासिक क्षेत्र, कचरा डेपो, डोंगराळ उतार भागातील आणि धोकादायक अवैध बांधकामे अधिकृत करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावर हरकती व सूचना मागविल्या व एक महिन्यात नागरिकांनी केलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून सरकारने अवैध बांधकामे अधिकृत करण्याची अधिसूचना जारी केली. त्यामुळे अवैध बांधकामे अधिकृत करण्याचा कायदा झाला. अधिसूचनाही प्रसिद्ध झाली. त्यानुसार महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१७ पासून अवैध बांधकामे नियमितकरण प्रक्रिया राबविली. 
......................
कक्ष करूनही प्रतिसाद नाहीच 
महापालिका मुख्यालयात स्वतंत्र कक्ष सुरु केला. नियमावलीतील जाचक अटी-शतीमुर्ळे बांधकामे नियमितीकरण प्रक्रियेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला. पहिल्या सहा महिन्यात केवळ चोविस जणांनी अर्ज केले होते. मुदत संपल्याने अर्ज स्वीकारण्यास बंद केले होते.  नगर विकास विभागाने अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ १८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत असणार आहे.  
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले,बांधकामे नियमितीकरणासाठी महापालिकेने कक्ष स्थापन केला आहे. अवैध बांधकामे नियमितीकरणासाठीची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध आहे. नियमितीकरणासाठी त्यासाठी सविस्तर अर्जाचे नमुने, आवश्यक कागदपत्रे, वारंवार विचारले जाणारे प्रश्न, सरकारी निर्णय याबाबतची सविस्तर माहिती या वेबसाईटवर अवैध बांधकामे नियमितीकरण या लिंकवर उपलब्ध आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासासाठी अर्ज सादर करावेत.

Web Title: Extension to the continuty construction works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.