‘अपस्मार’चे ग्रामीण भागात जादा रुग्ण
By admin | Published: November 18, 2016 05:11 AM2016-11-18T05:11:24+5:302016-11-18T05:11:24+5:30
अपस्मार या विकाराविषयी जनजागृती करणे, हा जागतिक अपस्मार दिनाचा मुख्य उद्देश आहे. सर्वसाधारण वाटणाऱ्या या विकाराचे ग्रामीण भागात
पिंपरी : अपस्मार या विकाराविषयी जनजागृती करणे, हा जागतिक अपस्मार दिनाचा मुख्य उद्देश आहे. सर्वसाधारण वाटणाऱ्या या विकाराचे ग्रामीण भागात प्राबल्य १.९ टक्के आहे. शहरी भागात प्राबल्य दर ०.६ टक्के आहे.
अपस्मार हा विकार कोणत्याही वयात जडू शकतोे. त्यात व्यक्तीला अचानक फीट येते. सुरुवातीच्या काळात या विकाराची जाणीव होत नाही. यामुळे तो पुढे जाऊन तीव्र होतो, यालाच फेफरे, फीट किंवा आकडी म्हणतात. या विकारामध्ये सुरुवातीस सौम्य असा फेफऱ्याचा झटका येतो. डोळ्यांच्या पापण्या फडफडणे, आकाशात टक लावून बघणे आदी प्रकार या सौम्य झटक्यामध्ये आढळून येतात. मेंदूतील चेतापेशीत होणाऱ्या बदलामुळे या आजाराला बळी पडतो.
यामध्ये जन्माच्या वेळी मेंदूला झालेला कमी आॅक्सिजनचा पुरवठा, मेंदूला जंतूचा संसर्ग, मेंदूला
झालेली दुखापत, हृदयरोग,
नैराश्य व भीती आदी कारणे या विकाराची ठरू शकतात. या विकाराबाबत वेळीच खबरदारी घेतली पाहिजे. सौम्य फेफऱ्याचा झटका वारंवार येत असेल, तर डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. या विकाराचे ७० टक्के रुग्ण औषधोपचार व शस्त्रक्रियेद्वारे बरे होऊ शकतात. (प्रतिनिधी)