बनावट कागदपत्रे करणारी ‘आरटीओ एजंट’ची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 08:38 PM2019-08-21T20:38:39+5:302019-08-21T20:43:52+5:30

परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाºया टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून बनावट सही आणि शिक्क्याची तसेच वेगवेगळ्या मजकुराची ८८ प्रकरणे जप्त करण्यात आली आहेत.

fake Gang of 'RTO Agent' arrested by Pimpri Police | बनावट कागदपत्रे करणारी ‘आरटीओ एजंट’ची टोळी जेरबंद

बनावट कागदपत्रे करणारी ‘आरटीओ एजंट’ची टोळी जेरबंद

Next

पिंपरी : परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाºया टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून बनावट सही आणि शिक्क्याची तसेच वेगवेगळ्या मजकुराची ८८ प्रकरणे जप्त करण्यात आली आहेत. १८ लाख रुपयांचा ऐवज या टोळीकडून जप्त केला आहे. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक भीमराव जोगदंड (वय ३७, रा. निगडी), बालाजी अशोक माशाळकर (वय ४०, रा. काळेवाडी), सचिन महादू साळवे (वय ३५, रा. तळवडे), मुकुंद दत्तू पवार (वय ३०, रा. निगडी), रामदास मच्छिंद्र हानपुडे (वय ३५, रा. चिखली), किरण रामभाऊ ढोबळे (वय २६, रा. भोसरी), खेतमल नामदेव पाटील (वय ३६, रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत (दि. २४) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील चारित्र्य पडताळणी विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांना रिक्षा परमिटसाठी लागणारे पोलिसांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळाले. त्यावरून पिंपरी-चिंचवड आरटीओ येथे काहीजण स्वयंघोषित एजंट म्हणून काम करत असून ते पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देत आहेत, अशी खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली. एजंटच्या स्वयंघोषित टोळीने पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांची बनावट सही व पोलीस आयुक्तालयाचा बनावट शिक्का तयार केला आहे. त्याद्वारे ते बनावट कागदपत्रे तयार करून रिक्षा परमिटसाठी त्याचा वापर करीत आहेत. या बदल्यात एका परमिट धारकाकडून १५ हजार ते ८० हजारांपर्यंत ही टोळी पैसे उकळत आहे. हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. 
गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संबंधित एजंटची माहिती काढली. तसेच सुरुवातीला तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांची चौकशी करून आणखी चार जणांना ताब्यात घेतले.  सात जणांकडून बनावट सही व शिक्क्याची वेगवेगळ्या मजकुराची ८८ बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे जप्त केली. तसेच काही शाळांचे शाळा सोडल्याचे कोरे दाखले, मुख्याध्यापकांच्या सहीचे कोरे दाखले, काही परिपूर्ण सही शिक्क्याचे दाखले, तहसीलदारांचे रहिवासी प्रमाणपत्र आढळून आले. पोलिसांनी आरोपींकडून चार वाहने, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर असा १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, चारित्र्य पडताळणी (विशेष शाखा) विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजन, तसेच युनिट एककडील सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, शिवाजी कानडे, काळू कोकाटे, अमित गायकवाड, महेंद्र तातळे, अंजनराव सोडगीर, मनोजकुमार कमले, प्रवीण पाटील, विशाल भोईर, गणेश सावंत, प्रवीण मोरे, सचिन मोरे, तानाजी पानसरे, सायबर विभागातील नाजुका हुलावळे, नीतेश बिचेवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: fake Gang of 'RTO Agent' arrested by Pimpri Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.