न्यायाधीश असल्याचे सांगून केला महिलेचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 07:52 PM2019-12-25T19:52:44+5:302019-12-25T19:54:00+5:30

मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगत महिलेशी ऑनलाईन ओळख वाढवली. तसेच महिलेच्या घरी येऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. याप्रकरणी एका तोतयावर गुन्हा दाखल केला आहे.

fake judged molested woman | न्यायाधीश असल्याचे सांगून केला महिलेचा विनयभंग

न्यायाधीश असल्याचे सांगून केला महिलेचा विनयभंग

Next

पिंपरी : मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचे सांगत महिलेशी ऑनलाईन ओळख वाढवली. तसेच महिलेच्या घरी येऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. याप्रकरणी एका तोतयावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ सप्टेंबर ते २२ डिसेंबर २०१९ या कालावधीत घडली आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुयश किसन मुळूक (रा. गंगापूर, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ३४ वर्षीय महिलेने  फिर्याद दिली आहे. आरोपी सुयश याने शादी डॉट कॉम या वधूवर सूचक संकेतस्थळावरून फिर्यादी महिलेशी ओळख केली. महिलेला ऑनलाईन फोटो पाठवून लग्नाची मागणी केली. 

आरोपी मुळूकने आपण मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याचेही सांगितले. त्यानंतर महिलेशी ओळख वाढवून तो महिलेच्या घरी आला. महिलेचे एक लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे. मुळूक याने त्या मुलीसोबत फोटो काढले. हे फोटो काढण्यासाठी फिर्यादी महिलेने हरकत घेतली. मात्र, तरीही आरोपीने ते फोटो डिलीट केले नाहीत. मुळूकने फिर्यादी महिलेसोबत लग्न केल्याचा खोटा दावा केला होता. 

Web Title: fake judged molested woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.