मारहाण करून लुटणारे तोतया पोलीस जाळ्यात; दोघांचे १० हजार लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:04 PM2020-03-01T18:04:52+5:302020-03-01T18:05:15+5:30

वाकड पोलीस ठाणे अंतर्गत काळेवाडी चौकीत पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी

Fake Police arrested who theft 10 Thousands of both person | मारहाण करून लुटणारे तोतया पोलीस जाळ्यात; दोघांचे १० हजार लुटले

मारहाण करून लुटणारे तोतया पोलीस जाळ्यात; दोघांचे १० हजार लुटले

Next
ठळक मुद्देवाकड ठाण्यात फिर्याद; जबरी चोरीचा गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड ( वाकड) : वाकड पोलीस ठाणे अंतर्गत काळेवाडी चौकीत पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून मारहाण करीत दोघांना लुटणारे दोन तोतया पोलीस वाकड पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.याबाबत अतिष चद्रकांत भोसले (वय ३४, रा. नढे नगर काळेवाडी) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिलिंद सूर्यवंशी (वय ) आशिष खरात (वय ) या दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतिष हे काळेवाडी येथील नवीन पुलावरून कामाला जात असताना मित्राचा फोन आल्याने रस्त्याच्या कडेला ते फोनवर बोलत थांबले होते. तेवढ्यात पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर खाकी पॅन्ट व गडद हिरव्या रंगाचा पोलिसांसारखा स्वेटर परिधान केलेले दोन इसम आले. पोलीस असल्याचे भासवून गाडीचे पेपर दाखव म्हणाले पाकीट काढून आर. सी दाखवताना पाकीट हिसकावून त्यातुन ५ हजार रुपये बळजबरीने काढून घेत तू इथेच थांब दहा मिनिटात येतो म्हणून फरार झाले. 
फिर्यादी यांनी काही तास वाट बघुन अखेर काळेवाडी चौकी गाठून हकिकत सांगितली असता असे कोणीही येथे कर्तव्यावर नाही असे सांगितले तेवढ्यात पुष्पेंद्र कोमलप्रसाद गौतम (वय २९) यांच्याकडूनही २९ फेब्रुवारी रोजी दमदाटी देऊन ५ हजार रुपये काढून घेतल्याचा जबाब त्यांनी दिला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Web Title: Fake Police arrested who theft 10 Thousands of both person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.