चेकवरची खोटी सही खरी भासवून मामा-भाच्याची ७७ लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 06:00 PM2020-08-14T18:00:33+5:302020-08-14T18:04:33+5:30

फिर्यादी व आरोपी यांचे एका बँकेत होते जॉईंट अकाऊंट..

False signature pretended to be true and fraud of Rs 77 lakh with uncle-nephew | चेकवरची खोटी सही खरी भासवून मामा-भाच्याची ७७ लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

चेकवरची खोटी सही खरी भासवून मामा-भाच्याची ७७ लाखांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे आळंदी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : चेकवर केलेली खोटी सही खरी भासवून, कुठलीही माहिती न देता मामा आणि भाच्याचा विश्वासघात करुन तब्बल ७७ लाख ७० हजार ५४६ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अविनाश सुधाकर थिटे (वय २९, रा. पिंपळेगुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आळंदी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
अमोल रमेश खारोळे व अर्चना अमोल खारोळे (दोघेही रा. च-होली खुर्द, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी फिर्यादी व त्याचे मामा यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करुन मे. खारोळे पाटील मँन्युफ्रँक्चरींग इंडस्ट्रीज ओपीसी प्रा.लि धानोरे, खेड या कंपनीत तसेच स्टीलनेटिक इंडस्ट्रीज प्रा.लि कंपनी सुरु केली. यात फिर्यादी व त्यांचे मामा यांना समान भागीदार करुन विकसनासाठी त्यांच्याकडून ७७ लाख ७० हजार ५४६ रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना आरोपींनी कुठलाही मोबदला न दिला नाही. याविषयी फिर्यादींनी आरोपीला विचारणा केली असता त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले.  ‘तुम्हाला तुमची गुंतवलेली रक्कम परत देतो. तुमची भागीदारी काढून घ्या’ असे सांगून प्रत्यक्षात फिर्यादींना पैसे दिले नाही. अशाप्रकारे आरोपींनी विश्वासघात करुन फसवणूक केली. तसेच फिर्यादी व आरोपी यांचे एका बँकेत जॉईंट अकाऊंट होते. त्या संबंधित बँकेंच्या चेकबुकवर खोटी सही करुन ती बँकेत खरी भासवून आरोपीने  ‘सिंगल पर्सन सिग्नेचर अथॉरिटी’ असलेल्या एका बँकेतील अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत. 

Web Title: False signature pretended to be true and fraud of Rs 77 lakh with uncle-nephew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.