'जीवनसाथी'वरील ओळख पडली महागात! लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 13:41 IST2023-07-25T13:41:00+5:302023-07-25T13:41:56+5:30
ही घटना हिंजवडी परिसरात घडली...

'जीवनसाथी'वरील ओळख पडली महागात! लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार
पिंपरी : लग्नाचे वचन देत तरुणाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तरुणाने दुसऱ्याच महिलेशी लग्न केले. हिंजवडी व वाशी परिसरात १४ ऑक्टोबर २०२१ ते १९ डिसेंबर २०२१ या कालावधीत ही घटना घडली.
पीडित महिलेने याप्रकरणी रविवारी (दि. २३) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अविनाश शिवाजी पाटील (वय ३१, रा. कोल्हापूर) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांची जीवनसाथी या मेट्रोमोनीअल वेबसाइटवर ओळख झाली.
ओळख वाढल्यानंतर आरोपीने फिर्यादीला भेटायला बोलावले. जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. लग्नाचे वचन देत वेळोवेळी अत्याचार केल्यानंतर जुलै २०२३ मध्ये दुसऱ्याच मुलीशी लग्न करत फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीने जाब विचारला असता तुला काय करायचे ते कर, असे म्हणत शिवीगाळ केली.