कुटुंबीय देवदर्शनाला गेलं अन् चोरट्यांनी घरच साफ केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 01:09 AM2018-11-17T01:09:11+5:302018-11-17T01:09:32+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दत्तात्रय कृष्णदेव शेरखाने (वय ३४, रा. सुंदर कॉलनी, शिवतीर्थनगर, थेरगाव) यांनी
वाकड : कुटुंबीय देवदर्शनाला गेल्याचा गैरफायदा उठवत घराचा दरवाजा उचकटून सव्वालाखाची रोकड, तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा दोन लाख नऊ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास शिवतीर्थनगर, थेरगाव येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दत्तात्रय कृष्णदेव शेरखाने (वय ३४, रा. सुंदर कॉलनी, शिवतीर्थनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरीष माने यांनी दिलेली माहिती - शेरखाने कुटुंबीय दिवाळीची सुटी असल्याने शिर्डी, शनि शिंगणापूर व वणी दर्शनाला गेले होते. दरम्यान १२ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत घराचे कुलूप उचकटून १ लाख २२ हजार रुपये रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा दोन लाख नऊ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.