शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा
By admin | Published: March 11, 2016 01:31 AM2016-03-11T01:31:00+5:302016-03-11T01:31:00+5:30
हिंजवडीतील टाटा टेक्नालॉजी कंपनीने सोशल कापोर्रेट रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत (सीएसआर) स्थानिक शेतकऱ्यांबरोबर व जोडप्रकल्पाला प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त
वाकड : हिंजवडीतील टाटा टेक्नालॉजी कंपनीने सोशल कापोर्रेट रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत (सीएसआर) स्थानिक शेतकऱ्यांबरोबर व जोडप्रकल्पाला प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केल्याने येथील १० शेतकऱ्यांच्या गटाने कंपनीचा एकदिवसीय अभ्यास दौरा करून प्रकल्पांची पाहणी केली.
सीएसआरअंतर्गत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती व शिक्षण क्षेत्रावर ते काम करीत
आहेत याचाच एक भाग म्हणून माजी सरपंच श्याम हुलावळे यांच्या पुढाकाराने परिसरातील शेतकऱ्यांच्या सुमारे दोन तासांच्या या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. कंपनीतील अधिकाऱ्यांनी टाकाऊ वस्तू व कचऱ्यापासून खतनिर्मिती व सेंद्रीय शेती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.
या वेळी कंपनीच्या सीएसआर विभागाचे मुख्याधिकारी अनुभव कपूर, अनू चौधरी, समन्वयिका मोनिका जोशी, अखिल अहिरण, योगेश भालेराव, रोहित पोरटकर यांच्यासह अभियंते सहभागी झाले होते. कंपनीचे सुविधा व्यवस्थापक कर्नल देवा कुमार व सीएसआर सल्लागार कुमार रामचंद्रन यांनी कॅन्टीनमध्ये उरलेल्या खरकट्या व टाकाऊ अन्नापासून तयार केलेला खतनिर्मिती प्रकल्प व सांडपाण्याचा विनियोग याबाबत माहिती दिली.
जोशी यांनी येत्या काळात सीएसआरच्या माध्यमातून तालुक्यातील गावांत पेयजल शुद्धीकरण केंद्र, पथदिवे, शाळेला ग्रंथालय, संगणक लॅब, गावातील नागरी सुविधा व सुशोभीकरण यावर भर देणार असल्याचे सांगितले. आयटी अभियंत्यांचा दिनक्रम अगदी मिनिटावर असतो. त्यांना वेळेनुसार लाखो रुपये पगार मिळतो. मात्र केवळ या सामाजिक उपक्रमासाठी हे सर्व ४० स्वयंसेवक दररोज दोनशे तास खर्च करीत आहेत.
हुलावळे यांच्यासह संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वसंत साखरे, सूर्यकांत साखरे, मनोज साखरे, संतोष
गवारे, हनुमंत साखरे, गणेश
साखरे, रोहिदास केदारी, गोकुळ काकडे यांच्यासह हिंजवडी-माणमधील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खताची बॅग आणि गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)