धम्मभूमीतील उपोषण दुसऱ्या दिवशी सुरुच

By Admin | Published: December 24, 2016 12:25 AM2016-12-24T00:25:59+5:302016-12-24T00:25:59+5:30

येथील ऐतिहासिक धम्मभूमी येथे गुरुवारी दुपारी धम्मभूमी महिला आघाडी संघाच्या महिलांनी सुरु केलेले आमरण उपोषण

The fast on the dhammabhoomi the next day | धम्मभूमीतील उपोषण दुसऱ्या दिवशी सुरुच

धम्मभूमीतील उपोषण दुसऱ्या दिवशी सुरुच

googlenewsNext

देहूरोड : येथील ऐतिहासिक धम्मभूमी येथे गुरुवारी दुपारी धम्मभूमी महिला आघाडी संघाच्या महिलांनी सुरु केलेले आमरण उपोषण शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवले आहे.
रात्रभर कडाक्याची थंडी असतानाही महिला कोणतीही पर्वा न करता उपोषण करीत आहेत. उपोषणाला विविध संघटना व पक्षांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. शुक्रवारी देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन बुद्धविहार बांधकामास संरक्षण विभागाकडून अद्याप परवानगी मिळाली नसल्याची सविस्तर माहिती दिली.
दोन दिवसांत आरपीआय जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, देवेंद्र तायडे, भारिप, एमआयएम, मराठवाडा जनविकास संघ, बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, झोपडपट्टी सेवा अध्यक्ष उत्तम हिरवे, प्रवीण कांबळे, गणेश गायकवाड, लक्ष्मण भालेराव, मराठवाडा जनसंघ अध्यक्ष अरुण पवार, संजय सूर्यवंशी युवा मंच आदींनी आंदोलक महिलांची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे.
शुक्रवारी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांनी उपोषणकर्त्या महिलांची भेट घेतली. या वेळी बोर्ड सदस्य गोपाळ तंतरपाळे, विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, हाजी मलंग मारिमुत्तू उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: The fast on the dhammabhoomi the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.