४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; पिंपरी-चिंचवडमधील अडीच लाख वीजपुरवठा खंडित!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 08:43 AM2023-05-19T08:43:00+5:302023-05-19T08:43:42+5:30

उकाड्याने नागरीक हैराण झाले होते...

Fault in 400 KV Extra High Voltage Power Lines; Two and a half lakh power supply cut off in Pimpri-Chinchwad! | ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; पिंपरी-चिंचवडमधील अडीच लाख वीजपुरवठा खंडित!

४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; पिंपरी-चिंचवडमधील अडीच लाख वीजपुरवठा खंडित!

googlenewsNext

पिंपरी : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी रात्री ७.१० वाजता अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे चाकण एमआयडीसीसह पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी विभागातील लाखो ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे उकाड्याने नागरीक हैराण झाले होते. 

पीजीसीआयएल शिक्रापूर ते पीजीसीआयएल तळेगाव अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिन्यांच्या चारपैकी दोन वाहिन्यांमध्ये काल (१८ मे) रात्री ७.१० वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही चिंचवड, २२० केव्ही उर्से, २२० केव्ही चाकण, १३२ केव्ही चाकण, १३२ केव्ही खराडी या अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला होता. यात सुमारे ३९६ मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे  पिंपरी गाव, चिंचवड, पुनावळे, वाल्हेकरवाडी, वाकड, ताथवडे, किवळे, रावेत, थेरगाव परिसर आणि संपूर्ण प्राधीकरणासह आकुर्डीमधील ५० टक्के परिसरातील २ लाख ३० हजार  ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता.

Web Title: Fault in 400 KV Extra High Voltage Power Lines; Two and a half lakh power supply cut off in Pimpri-Chinchwad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.