घाटमाथ्यावर फाजील आत्मविश्वास जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 01:13 AM2017-08-13T01:13:40+5:302017-08-13T01:13:47+5:30
पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा फाजील आत्मविश्वास जिवावर बेतणारा ठरतो. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या डोंगरातील धबधबा व लायन्स पॉइंटजवळील घुबड तलावाजवळील धबधब्यात
- विशाल विकारी
लोणावळा (पुणे) : पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा फाजील आत्मविश्वास जिवावर बेतणारा ठरतो. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या डोंगरातील धबधबा व लायन्स पॉइंटजवळील घुबड तलावाजवळील धबधब्यात पाय घसरून पडल्याने दोन तरुणांचा जुलै महिन्यात अंत झाला, तर आंदर मावळातील बेंदेवाडी येथील बंधाºयात पडून एका युवकाचा मृत्यू झाला.
घाटमाथ्यावरील लोणावळा, खंडाळा, मावळ तालुक्यातील आंदर व पवन मावळाचा निसर्ग पर्यटकांसाठी नंदनवन आहे. येथील हिरवागार निसर्ग, धरणे, फेसाळत वाहणारे धबधबे, गड-किल्ले व लेणी पाहण्यासाठी तसेच वर्षाविहारासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. लोणावळा परिसरात तरुण पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. युवक-युवती पर्यटनाचा आनंद घेताना काही वेळा फाजील आत्मविश्वासामुळे अपघातांना निमंत्रण देतात.
धरणाच्या पाण्यात उतरू नका, अशी सूचना करण्यात आलेली असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. व्हॅली परिसरात सुरक्षा रेलिंगच्या पुढे धोकादायकरीत्या कड्याच्या तोंडावर उभे राहून सेल्फी काढले जातात. डोंगरातून वाहणाºया धबधब्यांमध्ये पाण्यात उलट्या बाजूने डोंगरावर जाण्याचे धाडस करतात. त्यामुळे अपघात वाढत आहेत.
वारी भैरवगडच्या डोहात
१० वर्षांत १७१ बळी
तेल्हारा (अकोला) :
वारी भैरवगड येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर असून,
हे पर्यटनस्थळदेखील आहे. येथील वान नदीतील मामा-भाच्याचा डोह पर्यटकांचे
आकर्षण आहे,
मात्र त्याने अनेकांचा घातही केला आहे.
यंदाच्या मोसमात येथे तिघांचा बुडून मृत्यू झाला. १० वर्षांत १७१ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे.
बुलडाणा व अकोला जिल्ह्याच्या सीमेवर हे मंदिर आहे. डोहात कपारीही आहेत. पोहण्याचा मोह टाळू न शकणाºया अनेकांसाठी या कपारी मृत्यूचा सापळा बनल्या आहेत.
कपारीत अडकल्याने दोन महिन्यांत कैलास ठाकरे (३३), अकबरखा बशीर खान (२४) आणि हृषीकेश विलास सांगळे (२२) यांना प्राण गमवावे लागले.