भरधाव मोटार चालविणाऱ्याला अटक
By Admin | Published: October 15, 2016 05:51 AM2016-10-15T05:51:10+5:302016-10-15T05:51:10+5:30
पाबळ-राजगुरुनगर रस्त्यावर गुरुवारी रात्री होलेवाडी वळणावर भरधाव मोटारीने बेदरकारपणे तीन मोटारसायकली आणि एका मोटारीला उडविल्याने
राजगुरुनगर : पाबळ-राजगुरुनगर रस्त्यावर गुरुवारी रात्री होलेवाडी वळणावर भरधाव मोटारीने बेदरकारपणे तीन मोटारसायकली आणि एका मोटारीला उडविल्याने झालेल्या अपघाताप्रकरणी खेड पोलिसांनी चालक गणेश बबन पवार यांच्यावर गुन्हा नोंदविला आणि त्याला अटक करण्यात आली.
या अपघातातील जखमींची प्रकृती सुधारत आहे. आमदार सुरेश गोरे यांनी अपघातस्थळी गतिरोधक बसविण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले.
राजगुरुनगर-पाबळ रस्त्यावर होलेवाडी वळणावर पाबळकडून राजगुरुनगरकडे येणाऱ्या महिंद्र कंपनीची जीप (एमएच १४ डीएम ४९१२) या मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने एका दुचाकीला (एमएच १२ एस डब्लू ८९६३) जोरदार धडक दिली. दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ती भरधाव मोटार तशीच पुढे आली आणि मळूआईमंदिरा जवळ झेन (एमएच १२ ई बी ९९१२) या गाडीवर आदळली. तसेच तेथे असलेल्या दोन मोटारसायकलींना तिने धडक दिली आणि विरुद्ध बाजूला नाल्यात पडली होती. (वार्ताहर)