रिक्षाचालकांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:45 AM2017-08-03T02:45:08+5:302017-08-03T02:45:08+5:30

शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील रस्ते अपुरे पडत आहेत. तर रस्त्यावरील वाहनांमुळे रस्ता ओलांडणे मुश्कील झाले आहे.

Fighter travel by rickshaw drivers | रिक्षाचालकांचा जीवघेणा प्रवास

रिक्षाचालकांचा जीवघेणा प्रवास

googlenewsNext

रहाटणी : शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील रस्ते अपुरे पडत आहेत. तर रस्त्यावरील वाहनांमुळे रस्ता ओलांडणे मुश्कील झाले आहे. मात्र, काही वाहनचालक याची पर्वा न करता आपले वाहन चालविताना शहरात दिसून येत आहेत.
एखादे संकट आले तर त्यावर चांगल्या प्रकारे उपाय करणे गरजेचे आहे. मात्र स्वत: सह इतरांचाही जीव धोक्यात घालून वाहनचालविणे जीवावर बेतू शकते. पिंपरी येथील नव महाराष्ट्र विद्यालयाच्या समोरील रस्त्यावर एक रिक्षावाला बंद पडलेल्या रिक्षाला पाय लावून रस्त्यावरून चालवित निघाला. या ठिकाणी महापालिकेची शाळा, कॉलेज असल्यामुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
जोपर्यंत एखादा अपघात होत नाही, तो पर्यंत ठीक असते़ मात्र एखादा अपघात होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असते. नव महाराष्ट्र विद्यालयासमोरील रस्त्यावर दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या रस्त्यावरून वाहनांना सहजासहजी रस्ता मिळत नाही. त्यात एका बंद पडलेल्या रिक्षाला दुसºया रिक्षावाला पाय लावून ररस्त्याने जात होते. मात्र, यात एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण हा खरा प्रश्न आहे.

Web Title: Fighter travel by rickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.