... तर गुन्हे दाखल करणार

By Admin | Published: February 17, 2017 04:54 AM2017-02-17T04:54:36+5:302017-02-17T04:54:36+5:30

सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचला असताना आचारसंहितेचा भंग करून कायदा व सुव्यवस्थेचा

... to file criminal cases | ... तर गुन्हे दाखल करणार

... तर गुन्हे दाखल करणार

googlenewsNext

वाकड : सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचला असताना आचारसंहितेचा भंग करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या उमेदवारांची हयगय न करता थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा सर्वपक्षीय उमेदवारांना वाकड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिला.
निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन उमेदवारांकडून होणे गरजेचे आहे, याची दक्षता कशी घ्यावी. जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेतील प्रभाग २२ ते २८ मधील सर्वपक्षीय उमेदवारांची बैठक वाकड ठाण्यात घेण्यात आली. या वेळी उमेदवारांना सूचना व मार्गदर्शन करताना जाधव बोलत होते. या बैठकीला सुमारे ६० उमेदवार व काही प्रतिनिधी उपस्थित होते. आचारसंहितेचाभंग झाल्यास उमेदवारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.(वार्ताहर)

Web Title: ... to file criminal cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.