ओबीसींच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा; पिंपरीत विविध संघटनांचं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 02:50 PM2021-06-24T14:50:37+5:302021-06-24T14:54:02+5:30

ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरीतील आंबेडकर चौकात विविध संघटनांनी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केलं.

File a review petition in the Supreme Court for OBC reservation ; Agitation in the pimpri | ओबीसींच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा; पिंपरीत विविध संघटनांचं आंदोलन

ओबीसींच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा; पिंपरीत विविध संघटनांचं आंदोलन

Next

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील तितकाच ऐरणीवर आला आहे. यावरून विरोधीपक्षांसह ओबीसी समाजाने देखील आक्रमक भूमिका आरक्षणासाठी दंड थोपटले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी गुरुवारी (दि. 24 जून) पिंपरीतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध संस्था, संघटना आणि पक्ष प्रतिनिधींच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 

ओबीसी समाजाच्या आरक्षणासंबंधी दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ते पूर्ववत रहावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी पिंपरीत आंदोलन करण्यात आले. 

ओबीसी संघर्ष समिती, बारा बलुतेदार महासंघ, महाराष्ट्र राज्य प्रजा लोकशाही परिषद, महाराष्ट्र राज्य लोकशाही बचाव समिती, महात्मा फुले समिती परिषद, महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती, ओबीसी महासभा महाराष्ट्र प्रदेशभारतीय प्रजा सुराज्य पक्ष, प्रहार संघटना, महाराष्ट्र नाभिक महासंघ, वंचित बहुजन आघाडी, भाजपा ओबीसी आघाडी, अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ पुणे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ, महात्मा फुले मंडळ, श्री विश्वकर्मा सेवा भावी संस्था, श्री विश्वकर्मा वेल फेअर फाऊंडेशन,  महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ, कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र कुंभार विकास संस्था, सत्य शोधक नागरिक मंच, महाराष्ट्र माळी समाज महासंघ या संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
-------------------------------

Web Title: File a review petition in the Supreme Court for OBC reservation ; Agitation in the pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.