'पुन्हा संबंध ठेव नाही तर सोडणार नाही...'; धमकी देणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 20:10 IST2022-06-03T20:06:14+5:302022-06-03T20:10:02+5:30
चालत्या मोटार सायकवरून फिर्यादीच्या पायावर लाथ मारली...

'पुन्हा संबंध ठेव नाही तर सोडणार नाही...'; धमकी देणाऱ्या तरूणावर गुन्हा दाखल
पिंपरी : पुन्हा संबंध ठेव नाही तर तुला सोडणार नाही, अशी धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २०१८ पासून ते १ जून २०२२ सकाळी दहा वाजेपर्यंत फुगेवाडी ओव्हर ब्रिज, जुना पुणे-मुंबई हायवे, फुगेवाडी येथे घडली. या प्रकरणी संबंधित महिलेने गुरुवारी ( दि. २ ) भोेसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुल मोहन सुतार ( रा. राहटणी ) याच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीने २०१८ पासून फिर्यादी यांच्याशी असलेले संबंध पुन्हा ठेवण्यासाठी जबरदस्तीने पाठलाग केला. तसेच मैत्री करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून मारहाण आणि शिवीगाळ केली. फिर्यादी बुधवारी ( दि.१ ) ऑफिसला जात असताना आरोपीने थांबवण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी न थांबल्याने आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. तू माझ्या सोबत राहणार आहे की नाही? नाही तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली.
त्यांनतर चालत्या मोटार सायकवरून फिर्यादी यांच्या पायावर लाथ मारली. या प्रकारानंतर फिर्यादी तिथे न थांबता निघून गेल्या असता तूला सोडणार नाही अशी धमकी आरोपीने दिली.