ट्रक चालकाकडून कंपनीच्या मालाची हेराफेरी, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 05:04 PM2021-06-06T17:04:48+5:302021-06-06T17:04:55+5:30
श्रीनिवास कंपनी नवलाख उंब्रे येथील घटना
पिंपरी: एका कंपनीतून दुसरीकडे माल पोहोचवणाऱ्या ट्रक चालकाने मालाची हेराफेरी केल्याची घटना पिंपरीत घडली आहे. दिलेल्या २८ लाख ६३ हजार ८१० रुपयांचा माल दुसरीकडे न पाठवता फसवणूक केल्याचा प्रकार श्रीनिवास कंपनी नवलाख उंब्रे येथे २७ मे रोजी रात्री साडेआठ ते ५ जून दरम्यान घडला आहे.
राजेंद्र कुमार हनुमान शर्मा (वय ६२, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रमोद भगवान गुरनुले (रा. नवी टाकळी, जि. भंडारा), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी चालकाला ट्रकमध्ये २८ लाख ६३ हजार ८१० रुपये किंमतीचा माल नवलाख उंब्रे येथील श्रीनिवास कंपनीतून लोड करून दिला. नागपूर येथे महिंद्रा कंपनीत तो माल पोहोच करायचा होता. मात्र ट्रक चालकाने तो माल न पोहोचवता करता पळवून शर्मा यांची फसवणूक केली आहे. असे फिर्यादीत नमूद केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पांडे तपास करीत आहेत.