कोयत्यासह चाकू नाचवत व्हिडीओ तयार करणे दोन अल्पवयीन मुलांना पडले महागात; देहूरोड येथे कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 22:11 IST2021-07-05T22:11:37+5:302021-07-05T22:11:53+5:30
हत्यार बाळगल्याप्रकरणी अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल; देहूरोड येथे कारवाई

कोयत्यासह चाकू नाचवत व्हिडीओ तयार करणे दोन अल्पवयीन मुलांना पडले महागात; देहूरोड येथे कारवाई
पिंपरी : कोयत्यासह चाकू नाचवत व्हिडीओ तयार करणे दोन अल्पवयीन मुलांना महागात पडले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने देहूरोड येथे शनिवारी (दि. ३) ही कारवाई केली.
पोलीस कर्मचारी शुभम कदम यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन विधीसंघर्षित बालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीष माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधीसंघर्षीत बालकांकडे कोयता तसेच चाकू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गंडा विरोधी पथकाने दोन्ही विधीसंर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लोखंडी कोयता तसेच एक मोठा रॅम्बो चाकू चामडी कव्हरसह मिळून आला.
विधीसंघर्षित बालकांनी कोयत्यासह चाकू नाचवत असल्याचा व्हिडीओ तयार केला असल्याचे समोर आले आहे. भारतीय हत्यार कायद्यांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.