Eknath Shinde: ट्राफिक सोडवण्यासाठी खड्डे बुजवा; मुख्यमंत्र्यांनी केली आयुक्तांची कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 05:05 PM2024-08-07T17:05:57+5:302024-08-07T17:07:06+5:30

रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत सातत्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे

fill potholes to relieve traffic The Chief Minister eknath shinde opened the ears of the Commissioners | Eknath Shinde: ट्राफिक सोडवण्यासाठी खड्डे बुजवा; मुख्यमंत्र्यांनी केली आयुक्तांची कानउघाडणी

Eknath Shinde: ट्राफिक सोडवण्यासाठी खड्डे बुजवा; मुख्यमंत्र्यांनी केली आयुक्तांची कानउघाडणी

पिंपरी : शहरात खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. ती सोडवायची असेल तर खड्डे बुजवा, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त शेखर सिंह यांची कानउघाडणी केली. त्यामुळे आयुक्तांनी मंगळवारी (दि. ६) झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत खड्ड्यांबाबत जाब विचारला; तसेच तातडीने खड्डे बुजवून अहवाल देण्याचे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविल्याचे दावे केले जातात. प्रत्यक्षात थोडा पाऊस झाला की, रस्त्यांची चाळण होण्यास सुरुवात होते. रस्ते खोदाईस १५ मेनंतर परवानगी दिली जात नसल्याचे सांगितले जाते; मात्र अत्यावश्यक कामांच्या नावाखाली पावसाळ्यात बिनधास्त खोदाई सुरू असते. सध्या तर महापालिकेच्या मुख्यालयासमोरच खोदाई सुरू आहे. अगोदरच खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त असताना त्यात खोदाईमुळे अरुंद झालेल्या रस्त्यांची भर पडते. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत सातत्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्याही नजरेतून सुटले नाहीत खड्डे

पिंपरी-चिंचवड शहरात पक्के, कच्चे असे २०७३ किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. पवना नदीवर १४, मुळा नदीवर १०, तर इंद्रायणी नदीवर चार पूल आहेत. शिवाय १७ उड्डाणपूल, १८ भुयारी मार्ग, १० समतल विलगक आणि चार पादचारी भुयारी मार्ग आहेत. रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, निगडी, भोसरी, चऱ्होली, तळवडे, ताथवडे, वाकड, सांगवी यांसह वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. लगतच्या हिंजवडी माहिती-तंत्रज्ञाननगरीतील रस्त्यांवरही खड्डेच खड्डे आहेत. वाकडमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरदेखील खड्डे आहेत. ते मुख्यमंत्र्यांच्या नजरेतून सुटले नसल्याने महापालिकेचे पितळ उघडे पडले असल्याची चर्चा होती.

Web Title: fill potholes to relieve traffic The Chief Minister eknath shinde opened the ears of the Commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.