...अखेर जनाई उपसातून पाणी सोडले!
By admin | Published: April 22, 2015 05:31 AM2015-04-22T05:31:33+5:302015-04-22T05:31:33+5:30
जनाई उपसा जलसिंचन योजनेतून सोमवारपासून (दि. २०) परिसरातील गावांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी
सुपे : जनाई उपसा जलसिंचन योजनेतून सोमवारपासून (दि. २०) परिसरातील गावांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती जनाई योजनेचे उपअभियंता आर. एन. सालगुडे यांनी दिली.
सुपे (ता. बारामती) तलावातंर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उन्हाळी आवर्तन सोडण्यात येत आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची मागील दोन महिन्यांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. तसेच, येथील शेतकऱ्यांनी आगाऊ पाणीपट्टीची रक्कम पाटबंधारे विभागाकडे सुपूर्त केली होती. त्यानुसार या तलावात पाणी सोडण्यात येत आहे.
सुपे तलावात पाणीसाठा
राहिला नसल्याने ग्रामस्थांना
पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार होते. येथील शासकीय
विहिरींच्या पाण्याची पातळी खोलवर गेली होती.
येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा तीव्र स्वरूपात जाणवत होत्या. त्यामुळे येथे दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येत होते. येथील शासकीय विहिरींनाजच्या ओढ्याद्वारे पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आर. के. चांदगुडे यांनी दिली.
सध्या वरवंड तलावात ७० ते ८० क्युसेसने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे त्याच दाबाने पुढे उपसा करण्यात येत आहे. (वार्ताहर)