स्वस्त धान्य दुकानात रेशन मिळेना

By Admin | Published: March 20, 2017 04:20 AM2017-03-20T04:20:23+5:302017-03-20T04:20:23+5:30

येथील परिसरात स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभाराचा फटका ग्राहकांना बसत असून, महिन्यातून केवळ पंधरा

Finding ration in cheaper grains | स्वस्त धान्य दुकानात रेशन मिळेना

स्वस्त धान्य दुकानात रेशन मिळेना

googlenewsNext

चिखली : येथील परिसरात स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभाराचा फटका ग्राहकांना बसत असून, महिन्यातून केवळ पंधरा दिवसच धान्य वाटप केले जात आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असून त्यामुळे बराच ग्राहकांना धान्य मिळेनासे झाले आहे.
चिखली परिसरातील मोरेवस्ती कुदळवाडी, जाधववाडी तसेच चिखली गावठाण आदी भागात पूर्वी ५ ते ६ स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरीत होत असे. यातील काही दुकानदारांनी काही कारणांमुळे आपापली दुकाने बंद केली असल्या कारणामुळे कित्येक कार्डधारकांचे रेशन बंद झाले आहे. तर काही कार्डधारकांना इतर दुकानदारांकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच नवीन नोंदणी करणाऱ्या कार्डधारकांनाही तलाठी कार्यालयातुन रेशनिंगसाठी याच दुकानदारांकडे पाठवले जाते. यामुळे आधीच कार्डधारकांची संख्या जास्त असल्याने सदर दुकानांवर आतिरिक्त कार्डधारकांना धान्य पुरविणे अवघड होत आहे. नविन कार्डधारकांना साठा नसल्याचे सांगून रेशनिंग देण्यास नकार दिला जातो. काही दुकानदार युनीट प्रमाणे धान्य वाटप करत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. कित्येक ग्राहकांना तुमचे रेशन वरुन बंद केले असल्याची सबब सांगीतली जाते. सध्या चिखलीत दोन दुकांनामर्फत धान्य वाटप केले जात आहे. मात्र या दुकानांतुन महीन्यातून केवळ पंधराच दिवस धान्य वाटप केले जात असून दुकानदार त्यांच्या सवडी नुसार वेगवेगळ्या वेळेत धान्य वाटप करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Finding ration in cheaper grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.