हाताची घडी तोंडावर बोट!

By admin | Published: December 22, 2015 01:13 AM2015-12-22T01:13:22+5:302015-12-22T01:13:22+5:30

तुमच्या आगारातील बस किती? तुमच्या डेपो अंतर्गत किती बसथांबे येतात? दररोज नेमक्या किती बसेसचे संचलन होते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न येणाऱ्या

Finger in your hand! | हाताची घडी तोंडावर बोट!

हाताची घडी तोंडावर बोट!

Next

पुणे : तुमच्या आगारातील बस किती? तुमच्या डेपो अंतर्गत किती बसथांबे येतात? दररोज नेमक्या किती बसेसचे संचलन होते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न येणाऱ्या पीएमपीच्या आठ डेपो मॅनेजरला बैठकीत तब्बल दहा मिनिटे उभे करण्याची शिक्षा पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी एका बैठकीत नुकतीच केली. डेपोंचा आढावा घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत दहा डेपो मॅनेजरमधील आठ डेपो मॅनेजरला आपल्या डेपोंची माहितीच नसल्याने ही शिक्षा करण्याची वेळ आल्याचे या बैठकीस उपस्थित असलेल्या एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले.
मागील आठवड्यात पीएमपीच्या स्वारगेट डेपोतील एका कर्मचाऱ्याचा स्वच्छतागृहात अकस्मात मृत्यू झाल्याने सर्व डेपो मॅनेजरला अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तसेच खबरदारीचे उपाय घेण्यासाठी कृष्णा यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीत मॅनेजरला सूचना देण्यात आल्यानंतर कृष्णा यांनी एका मॅनेजरला तुमच्या अखत्यारित किती बसथांबे येतात, हा प्रश्न विचारला. या डेपो मॅनेजरला उत्तरच देता आले नाही. या वेळी कृष्णा यांनी आणखी दोन प्रश्न विचारले. त्याचेही उत्तर या मॅनेजरला देता आले नाही.
हा मॅनेजर दहा मिनिटे उभा राहून इकडे तिकडे पाहत होता. त्यानंतर कृष्णा यांनी पुढच्या मॅनेजरला हेच प्रश्न विचारले. त्यांनाही उत्तर
देता येईना, मग तेही उभे.
त्यानंतर त्यांनी ओळीने आणखी आठ डेपो मॅनेजरला हे प्रश्न विचारले. त्यामुळे उत्तर न येणारे सहा
मॅनेजर आपणहूनच उभे राहिले.
तर अवघ्या दोन मॅनेजरनी कृष्णा
यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामुळे त्या मॅनेजरला बसवून इतर आठ मॅनेजरना हाताची घडी घालून या बैठकीत काही काळ उभे करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Finger in your hand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.