चिखली येथे पुठ्ठ्याच्या गोदामाला आग; पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 10:16 PM2021-07-05T22:16:40+5:302021-07-05T22:17:58+5:30
लाकडे आणि पुठ्ठ्याच्या गोदामाला आग लागली; पाच तासांनी आग आटोक्यात यश
पिंपरी : लाकडे आणि पुठ्ठ्याच्या गोदामाला आग लागली. पाच तासांनी आग आटोक्यात आली. जाधववाडी, चिखली येथे वडाचा मळा परिसरात सोमवारी (दि. ५) ही घटना घडली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुठ्ठ्याच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर पिंपरीच्या अग्निशामक मुख्यालयातून तसेच चिखली आणि तळवडे उपकेंद्रातून प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे रौद्र स्वरूप पाहता पिंपरी मुख्यालय तसेच प्राधिकरण आणि भोसरी उपकेंद्रातून आणखी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्याचप्रमाणे पीएमआरडीएचे दोन आणि टेल्को कंपनीचा एक बंब देखील घटनास्थळी पोहचले. याशिवाय दोन टॅंकरचीही पाण्याच्या वाहतुकीसाठी मदत घेण्यात आली. गोदामाला लागूनच असलेली सहा घरे अग्निशामक दलाने खाली केली. सकाळी साडेसहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.