चिखलीत दरवाजाच्या कारखान्याला आग, लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:24 AM2018-03-10T05:24:37+5:302018-03-10T05:24:37+5:30

प्लायवूडचा दरवाजा बनविणा-या कारखान्याला शुक्रवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. यात मशिन, प्लायवूड, तसेच इतर साहित्य खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही.

 Fire at the Chikhliyat Door factory, loss of millions of rupees | चिखलीत दरवाजाच्या कारखान्याला आग, लाखो रुपयांचे नुकसान

चिखलीत दरवाजाच्या कारखान्याला आग, लाखो रुपयांचे नुकसान

googlenewsNext

चिखली -येथील प्लायवूडचा दरवाजा बनविणाºया कारखान्याला शुक्रवारी (दि. ९) दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. यात मशिन, प्लायवूड, तसेच इतर साहित्य खाक झाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही. घटनास्थळी दाखल अग्निशामक दलाच्या जवानांना अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले; परंतु आगीचे कारण समजू शकले नाही.
चिखली येथे देहू-आळंदी रस्त्यालगत वेदान्त हॉटेलच्या मागे असलेल्या शेडच्या ओळीतील सर्वांत शेवटी प्लायवूडचे दरवाजे व इतर साहित्य बनविणाºया कारखान्याला आग लागली. शुक्रवारी सुटी असल्यामुळे एकही कामगार कंपनीत हजर नव्हता. आगीत सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कारखान्याचे मालक प्यारुसाहेब शेख यांनी सांगितले.
आग विझविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पिंपरीतील संत तुकारामनगर, तळवडे, प्राधिकरण, भोसरी येथील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अरुंद रस्ता असल्याने अग्निशामक बंब घटनास्थळी नेण्यासाठी जवानांना मोठी कसरत करावी लागली. बंब घटनास्थळी जाईपर्यंत कारखान्यातील सर्व लाकडी प्लाय, शीट, तसेच इतर सामानाने पेट घेतला होता. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तरीही आगीच्या ज्वाळा उग्र रूप घेत होत्या.

अग्निशामक दलाचे उपअधिकारी उदय वानखेडे, प्रताप चव्हाण, फायरमन शांताराम काटे, प्रदीप कांबळे, गोरखनाथ घाडगे, दिनेश इंगलकर, महेंद्र पाठक, अवतारे, सारंग मंगरूळकर, विवेक खांदेवाड, रुपेश जाधव, राजेंद्रकुमार गवळी, शिवलाल झणकर, वाहनचालक प्रदीप भिलारे, नारायण तापकीर यांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.


 

Web Title:  Fire at the Chikhliyat Door factory, loss of millions of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.