Video: रहाटणीतील ५ मजली व्यावसायिक इमारतीत आग; नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 05:52 PM2022-12-08T17:52:46+5:302022-12-08T18:13:29+5:30

अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल

Fire in 5 storied commercial building in Rahatni Firefighters attempt to evacuate civilians | Video: रहाटणीतील ५ मजली व्यावसायिक इमारतीत आग; नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न

Video: रहाटणीतील ५ मजली व्यावसायिक इमारतीत आग; नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न

Next

पिंपरी : रहाटणी येथील शिवार चौकातील रेनबो प्लाझा या इमारतीत गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. पाच मजली या इमारती हॉटेल तसेच विविध व्यावसायिक कार्यालय आहे. या कार्यालयांमध्ये काही कर्मचारी व नागरिक अडकले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांकडून अशा व्यक्तीचे प्रयत्न सुरू आहेत. 

आकुर्डी येथे अगरबत्तीच्या कारखान्याला लागलेली आग तिसऱ्या दिवशीही धुमसत असतानाच रहाटणीतील इमारतीत मोठी आग लागली. इमारतीच्या इलेक्ट्रिक केबलसाठी असलेल्या डक्टमधून धूर निघत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. पाहणी केली असता आग लागल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे इमारतीमधील सर्व कार्यालयांमधील कर्मचारी व नागरिकांना इमारती मधून बाहेर पडण्यासाठी आवाहन करण्यात आले. आग वाढल्याने इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर झाला. याबाबत माहिती मिळतच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाणी फवारून धूर कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर काच फोडून इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून आग नियंत्रणात आणण्यासाठी कसरत केली जात आहे. 

दरम्यान, शिवार चौकात मोठी गर्दी झाली. वाहतूक पोलीस व सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Fire in 5 storied commercial building in Rahatni Firefighters attempt to evacuate civilians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.