फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: November 13, 2023 05:54 PM2023-11-13T17:54:39+5:302023-11-13T17:54:58+5:30

अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला

Fire incidents at 18 places in Pimpri-Chinchwad due to firecrackers Fire to 11 houses | फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना; ११ घरांना आग

पिंपरी : दिवाळीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली जात आहे. लक्ष्मीपूजनानंतर रविवारी शहर, उपनगरात मोठ्या प्रमाणावर केलेल्या आतषबाजीमुळे शहरातील विविध १८ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. त्यामध्ये सर्वाधिक ११ ठिकाणी घरांना आग लागल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला.

दिवाळीनिमित्त फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली जात आहे. न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत दिवसभर फटाके फोडले जात आहेत. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. रविवारी रात्री लक्ष्मीपूजनानंतर शहरासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या आतषबाजीमुळे शहरातील १८ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.

जुनी सांगवी, पिंपळे सौदागर, वाकड, फुगेवाडी, कासारवाडी, काळेवाडी, भोसरीतील पहिल्या मजल्यावरील घराला आग लागली होती. रावेत येथे एका दुकानाला आग लागली होती. चिखलीत चौथ्या मजल्यावरील घराला आग लागली होती. वडमुखवाडीत सलूनच्या दुकानाला आग लागली होती. आकुर्डी, एम्प्यायर इस्टेट येथील सातव्या मजल्यावरील घराला आग लागली होती. पिंगळेसौदागर येथे झाडाला आग लागली होती. मोरवाडीत घराला तर मोशीत एका कंपनीला आग लागली होती. पिंपरी बाजारपेठेतील एका कपड्याच्या दुकानाला आग लागली होती. दापोडीत एका घराला आग लागली होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही. अग्निशमन विभागाच्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला. सातत्याने येणाऱ्या वर्दीमुळे अग्निशमन विभागाच्या जवानांची मात्र मोठी धावपळ झाली.

Web Title: Fire incidents at 18 places in Pimpri-Chinchwad due to firecrackers Fire to 11 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.