वाल्हेकरवाडीत भीषण आग, अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 06:22 PM2020-04-14T18:22:42+5:302020-04-14T18:23:33+5:30
आग लागलेल्या भंगार दुकानालगतच परिसराला विद्युत पुरवठा करणारे होते रोहित्र...
रावेत : वाल्हेकरवाडी येथील सायली कॉम्प्लेक्स लगत असणाऱ्या भंगाराच्या दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले होते. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एक तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.यामध्ये भंगारचे दुकाने जळून खाक झाले आहे.
सुदैवाने या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही.कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झालेले आहे. वाल्हेकरवाडीत देखील संपूर्ण लॉकडाऊन झालेले असतानाच आज (मंगळवार दि. १४) दुपारी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सायली कॉम्प्लेक्स परिसरातील भंगाराच्या दुकानांमध्ये दुपारी अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये भंगारचे दुकाने जळून खाक झाले आहे.काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले.या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग वाढत असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न सुरू करून आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. महापालिकेची अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे सोपे गेले, मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी अली शेख यांचे भंगार दुकान व एका दवाखान्याचे गोडाऊन असल्याचे समजते.
मोठा अनर्थ टळला....
आग लागलेल्या भंगार दुकानालगतच परिसराला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र आहे. आग लागलेली समजताच महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच वीजपुरवठा खंडित केला त्याचबरोबर भंगाराच्या दुकानात असलेली दोन गॅस सिलेंडर तरुणांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढल्यामुळे त मोठा अनर्थ टळला.सदरचे दुकान हे अनाधिकृत पणे येथे उभारण्यात आले आहे.मागील तीन महिन्यात या दुकानाला चारवेळा आग लागण्याची घटना घडली आहे.भरवस्तीतील भंगारचे दुकान हटवावे याकरिता स्थानिकांनी अनेकवेळा पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु या तक्रारीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.प्रशासनाने तक्रारीची दखल घेऊन सदरचे दुकान येथून हटवले असते तर ही घटना घडली नसती अशी कुजबुज परिसरात ऐकायला मिळत होती.