पिंपरीत पहिल्या दिवशी महापालिका शाळांत केवळ ३२ टक्के हजेरी; विद्यार्थी पालकांची अनास्था
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 07:51 PM2021-01-04T19:51:29+5:302021-01-04T19:53:14+5:30
मार्च महिन्यानंतर आज प्रथमच शाळेची घंटा वाजली..
पिंपरी : कोरोनाचा आलेख कमी झाल्याने शहरातील इयत्ता नववी ते बारावीच्या माध्यमिक शाळा आणि कनिष्ट महाविद्यालये सोमवारपासून सुरू झाली आहेत. महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात केवळ विद्यार्थ्यांची ३२ टक्के हजेरी दिसून आली तर पालकांनी संमतीपत्रे भरून न दिल्याने खासगी शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत अनास्था दिसून आली.
मार्चपासून कोरोना सुरू झाल्याने जुनपासून सुरू होणाºया शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे गेले सात महिने शाळा आणि महाविद्यालये आॅनलाईन सुरू होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा आलेख कमी झाल्याने राज्य सरकारने नववी ते बारावीच्या शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, शहरातील सत्ताधारी भाजपाने त्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे गेले दोन महिने शाळा सुरू झालेल्या नव्हत्या. तिसऱ्या टप्यात ४ जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शाळा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. त्यानुसार आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत. महापालिकेची अठरा माध्यमिक विद्यालये आजपासून सुरू झाली. तर काही खासगी संस्थांनीही शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, पहिल्या दिवशी उपस्थिती अत्यल्प असल्याचे दिसून आले.
.........
अशी घेतली जातेय दक्षता
१) महापालिकेच्या वतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात नियमावली तयार केली आहे. त्यानुसार शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. शाळांना निर्जुंतुकीकरणाची व्यवस्था करण्याचे सुचविले होते. त्यानुसार शाळांमध्ये पहिल्या दिवशी मुलांचे तापमान तपासणी, आॅक्सीजन तपासणी करण्यात आली. तसेच स्वच्छतागृहे आणि साबण आणि सॅनिटायजर ठेवण्यात आले होते.
२) वर्गखोली आणि स्टाफरुममध्ये फिजिकल डिटन्स दिसून आले. वर्गखोल्यांतील बाकांवर मुलांची एकआड एक बसण्याची व्यवस्था केली होती. पहिल्या दिवशी फिजीकल डिस्टन्स दिसून आले.
////////////////
मुख्याध्यापकांवरही जबाबदारी
शाळा सुरू करताना शाळा व्यवस्थापक असणाºया मुख्याध्यापक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विभागप्रमुखांना पत्र पाठविले आहे. महापालिकेने कोवीड संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही, याबाबत देखरेख करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर दिली आहे. शिक्षकांचा कोवीड अहवाल शाळेच्या दप्तरी ठेवावे, शाळा परिसरात विद्यार्थी मास्कचा वापर करीत आहेत की नाहीत.मार्गदर्शक फलक लावणे, तसेच प्रार्थनेच्या वेळी किंवा खेळाच्या मैदानावर विद्यार्थी फिजिकल डिस्टन्सचे पालन करतात की नाही, यावर देखरेख करणे, तसेच शाळेचा परिसर दररोज स्वच्छ करतो की नाही. स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ होतात की नाही. तसेच शाळेतील वर्ग स्वच्छ करण्याविषयीचे नियंत्रण मुख्याध्यापकांकडे दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितप्रवासासाठी वाहनांची दोनदा स्वच्छता करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
........
शाळेचे नाव, उपस्थिती, टक्केवारी
१) केशवनगर शाळा ६७ २१.७३
२) संततुकारामनगर १८ ३९.१३
३) पिंपरीनगर १८ २६.२८
४) काळभोरनगर ५७ २६.४९
५) कासारवाडी १८ ६७.९२
६) पिंपळेगुरव २३४ ३६.४०
७) फुगेवाडी ३१ ३२.२९
८) निगडी। ८५ ३१.३०
९) वाकड ३३ २१.१०
१०) खराळवाडी। ५२ ५४.६९
११) भोसरी ८२ ३५.३४
१२) थेरगाव २७२ ४०.००
१३) पिंपळेसौदागर १४५ ५०.८४
१४) नेहरूनगर ४८ ६.७६
१५) आकुर्डी (उर्देू) २७। २५.००
१६) रुपीनगर ४७ ६.६५
१७) लांडेवाडी ४६ ४२.७०
१८) क्रीडा प्रबोधिणी ४० ४०.४५
........................................
एकुण ////१३३५ ३२.५०
..................
रुपीनगर, नेहरूनगरात कमी तर
कासारवाडीत सर्वाधिक उपस्थिती
महापालिका क्षेत्रात महापालिकेची १८ माध्यमिक विद्यालये आहेत. त्याठिकाणी शाळेच्या पहिल्याच दिवशी रुपीनगर, नेहरूनगरातील शाळेत ६ टक्के उपस्थिती होती. तर कासारवाडीतील शाळेत सर्वाधिक ६७.९२ टक्के उपस्थिती होती.