घरकुल लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर, लालटोपीनगरची दुसरी यादी लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 04:06 AM2017-11-05T04:06:57+5:302017-11-05T04:07:04+5:30

झोपडपट्टी विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या पुढाकाराने शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. चिंचवड, साईबाबानगर येथील पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी तयार झाली असून, नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी ही यादी त्या परिसरात लावली आहे.

The first list of the beneficiaries of the crib is announced, the second list of Lalapenagar will soon be available | घरकुल लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर, लालटोपीनगरची दुसरी यादी लवकरच

घरकुल लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर, लालटोपीनगरची दुसरी यादी लवकरच

Next

पिंपरी : झोपडपट्टी विकास प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या पुढाकाराने शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. चिंचवड, साईबाबानगर येथील पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी तयार झाली असून, नागरिकांच्या सूचना, हरकतींसाठी ही यादी त्या परिसरात लावली आहे. काही दिवसांतच लालटोपीनगरची दुसरी यादी लावली जाणार आहे. अपात्र ठरलेल्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यास ते पात्र ठरू शकणार आहेत, अशी माहिती एसआरएच्या अधिकाºयांनी दिली.
साईबाबानगरमध्ये एकूण झोपड्यांची संख्या ४२६ इतकी आहे. त्यातील निवासी झोपड्यांची संख्या ३५९ इतकी आहे. पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची संख्या २१२ तर अपात्र ठरलेल्यांची संख्या १४७ इतकी आहे. पुनर्वसन योजनेस संमती दिलेल्या झोपडीधारकांची संख्या २१२ इतकी आहे. ही यादी लावल्यानंतर साईबाबानगरमधील झोपडीधारकांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या संपर्क कार्यालयाकडे धाव घेतली.
आपले नाव अपात्र यादीत नाही ना? याची खात्री करून घेऊ लागले आहेत. ज्या कारणास्तव झोपडीधारक अपात्र ठरले, त्यासंबंधीच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्रुटी दूर झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांमध्ये त्यांचे नाव येऊ शकते, अशी माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. साईबाबानगर येथील कार्यकर्ते मारुती पंद्री यांनी झोपडीधारकांची समजूत घातली. अधिकाधिक झोपडीधारकांना घरकुल मिळावे, ज्यांच्याकडे आवश्यक ते पुरावे आहेत, जे पात्र ठरू शकतात, या करिता पाठपुरावा करणार असल्याचे पंद्री यांनी झोपडीधारकांना सांगितले.

लालटोपीनगरची दुसरी यादी लवकरच
मोरवाडीतील लालटोपीनगरमधील झोपडीधारकांची दुसरी यादी लवकरच जाहीर होणार आहे. सुमारे ११३० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. युद्धपातळीवर लालटोपीनगरच्या पुनर्वसन योजनेचे काम सुरू आहे. एसआरएअंतर्गत हा पहिलाच प्रकल्प शहरात साकारत आहे. गवळीमाथा येथील झोपडपट्टीचे एसआरएअंतर्गत पुनर्वसन करण्याचे नियोजन आहे. तेथील झोपडीधारकांचेही सर्व्हेक्षण झाले आहे.

Web Title: The first list of the beneficiaries of the crib is announced, the second list of Lalapenagar will soon be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर