समूहगीत स्पर्धेत ‘सेंट जॉर्ज’ प्रथम
By Admin | Published: October 6, 2016 02:58 AM2016-10-06T02:58:57+5:302016-10-06T02:58:57+5:30
लायन्स क्लब आॅफ देहूरोड आयोजित देशभक्तिपर समूहगीत स्पर्धेत मामुर्डी येथील सेंट जॉर्ज हायस्कूलने प्रथम क्रमांक मिळविला
किवळे : लायन्स क्लब आॅफ देहूरोड आयोजित देशभक्तिपर समूहगीत स्पर्धेत मामुर्डी येथील सेंट जॉर्ज हायस्कूलने प्रथम क्रमांक मिळविला.
शितळानगर येथील लायन्स क्लब शाळा आणि अशोकनगर (चिंचोली) येथील आर्मी पब्लिक स्कूलने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. किन्हई येथील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या साने गुरुजी प्राथमिक शाळेने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. विजेत्यांचा रोख बक्षीस व स्मृतिचिन्हाने गौरव करण्यात आला.
परिसरातील शाळांतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धेत नऊ शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण तबला अलंकार हभप भीमराजमहाराज हांडे यांनी केले. क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, नरेंद्र महाजनी, संजय माळी, जोगेंद्र भाटिया, नरेंद्र डोईफोडे, काशिनाथ जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. अशोक खैरे, श्रीरंग सावंत, शशिकांत शिंदे, अवतारसिंग कांद्रा, सावळाराम वानखेडे, बी. पी. भांदकर, गुरमेलसिंग रत्तू, अविनाथ बिंड, मधुकर बिंड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
तळेगावात स्वच्छता दिन साजरा
४ तळेगाव दाभाडे : येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल व लायन्स क्लब आॅफ तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्री जयंतीनिमित्त स्वच्छता दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत काकडे, लायन्स अध्यक्ष नीलेश मेहता, प्रकल्पप्रमुख अनिल तानकर, शाळाध्यक्ष संदीप काकडे, जगदीश झोमटे, यशवंत पाटील, दीपक बाळसराफ व शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी स्वागत केले. महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रकल्पप्रमुख अनिल तानकर यांनी महात्मा गांधींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश प्रत्येकाने जीवनात अंगीकारावा, असे सांगितले. विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.
४मनोहरनगर येथील वरद विनायक सांस्कृतिक कला मित्र मंडळाचे कार्यकर्ते, शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शाळेचा परिसर व संपूर्ण मनोहरनगर कॉलनीमध्ये स्वच्छता मोहीम राबविली. मानसी निकम यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश मेहता यांनी आभार मानले.