वर्चस्ववादातून ‘त्या’ तरुणाचा खून; मुख्य सूत्रधारासह पाच आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 10:17 PM2021-06-09T22:17:55+5:302021-06-09T22:18:04+5:30

परिसरात वर्चस्व कोणाचे? या वादातून एका सराईत गुन्हेगाराचा कट रचून थेरगाव येथे खून करण्यात आला होता.

Five accused including the mastermind were arrested in the thergaon youth murder case | वर्चस्ववादातून ‘त्या’ तरुणाचा खून; मुख्य सूत्रधारासह पाच आरोपींना अटक

वर्चस्ववादातून ‘त्या’ तरुणाचा खून; मुख्य सूत्रधारासह पाच आरोपींना अटक

Next

पिंपरी : परिसरात वर्चस्व कोणाचे? या वादातून एका सराईत गुन्हेगाराचा कट रचून खून केला. १६ नंबर बस थांबा, थेरगाव येथे रविवारी (दि. ६) ही घटना घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह पाच आरोपींना अटक केली. तसेच त्याच्या एका अल्पवयीन साथीदारासही ताब्यात घेतले.

पंकज अभिमन्यू धोत्रे (वय २२, रा. नेरे-दत्तवाडी, पुणे), असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार चेतन दीपक विटकर (वय २६), नीलेश जितेंद्र फडतरे (वय २०), सुमीत विजय हाराळे (वय १९), प्रथमेश बाळू शिंदे (वय १९) आणि मंथन सुधाकर चव्हाण (वय १९, सर्व रा. थेरगाव), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पंकज धोत्रे आणि आरोपी चेतन वीटकर यांच्यात परिसरातील वर्चस्व कोणाचे यावरून वाद होता. या वादातूनच ते एकमेकांना संपविण्याची भाषा करीत होते. दोनच दिवसांपूर्वी चेतन विटकर आणि पंकज धोत्रे यांच्यात फोनवरून वाद झाला होता. पंकज आपल्याला मारण्या आधीच आपण त्याचा काटा काढू, असे आरोपींनी ठरविले. त्यानुसार आरोपींनी कट रचून पंकज याच्यावर कोयत्याने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. 

याबाबत माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यानुसार पोलिसांना सुरवातीला तीन आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना अटक केली. तर अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. आरोपींना विश्‍वासात घेऊन चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. 

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, अनिल लोहार, पोलीस कर्मचारी बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापूसाहेब धुमाळ, राजेंद्र काळे, दीपक भोसले, वंदू गिरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, सुरज सुतार, कौंतेय खराडे, कल्पेश पाटील, सागर कोतवाल यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Five accused including the mastermind were arrested in the thergaon youth murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.