विद्यानगर प्रभागात पाचजण रिंगणात
By admin | Published: April 2, 2016 03:34 AM2016-04-02T03:34:26+5:302016-04-02T03:34:26+5:30
महापालिकेच्या विद्यानगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी बारा उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यांपैकी आजअखेर सात जणांनी माघार घेतली.
चिंचवड : महापालिकेच्या विद्यानगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी बारा उमेदवारांनी अर्ज सादर
केले होते. त्यांपैकी आजअखेर
सात जणांनी माघार घेतली.
त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेस, भाजपा, शिवसेना व भारिप बहुजन महासंघाचे पाच उमेदवार रिंगणात आहेत.
राष्ट्रवादीचे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचा पुणे विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अनुसूचित जातीचा दावा अमान्य करत त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला होता. त्यामुळे १७ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसतर्फे सतीश भोसले, भाजपतर्फे माजी नगरसेवक भीमा बोबडे, शिवसेनेतर्फे राम पात्रे, राष्ट्रवादीतर्फे दत्तात्रय मोरे, भारिप बहुजन महासंघातर्फे शारदा बनसोडे, अपक्ष म्हणून सुनील गायकवाड, बालाजी जाधव, मिलिंद कांबळे, मनोज कसबे, हिरामण खवळे, गजरा मोरे व दत्तात्रय थोरात यांनी उमेदवारीअर्ज भरले होते.
अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार सुनील गायकवाड, बालाजी जाधव, मिलिंद कांबळे, मनोज कसबे, हिरामण खवळे, गजरा मोरे व दत्तात्रय थोरात या सातही जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. उद्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.(प्रतिनिधी)