एमआयडीसीतील पाच हजार बांधकामे नियमित होणार

By Admin | Published: May 28, 2017 03:55 AM2017-05-28T03:55:04+5:302017-05-28T03:55:04+5:30

पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील जी ब्लॉकमधील (शाहूनगर) रहिवाशी इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकताच घेतला

Five thousand constructions of MIDC will be regular | एमआयडीसीतील पाच हजार बांधकामे नियमित होणार

एमआयडीसीतील पाच हजार बांधकामे नियमित होणार

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील जी ब्लॉकमधील (शाहूनगर) रहिवाशी इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकताच घेतला. एमआयडीसी संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. याचा फायदा पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे पाच हजारांहून अधिक मिळकतधारकांना होणार आहे, अशी माहिती आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीतील कामगारांच्या सोयीसाठी जी ब्लॉकमधील एमआयडीसीच्या निवासी भूखंडावर सोसायटी स्थापन करून रहिवाशी प्रकल्प आकारास आला. सदर इमारतींमध्ये राहण्यासाठी आलेल्या कामागारांनी अल्प जागेमुळे इमारतीतील बाल्कनी भिंत तोडून ही जागा खोलीमध्ये समाविष्ट केली. यामुळे कायदेशीदृष्ट्या सदनिकेच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळत नव्हता. त्यामुळे सदनिकेच्या विक्री तसेच हस्तांतरण या बाबींना अडथळा निर्माण झाला होता.
याबाबत चाबुकस्वार म्हणाले,‘‘उद्योगमंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांसह पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसराला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर या प्रश्नावर महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.’’
पत्रकार परिषदेस शिवसेनेचे शहरप्रमुख, गटनेते राहुल कलाटे, अमित गावडे, नगरसेविका मीनल यादव, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, प्रकाश बाबर, अनंत कोऱ्हाळे, शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव, पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.


मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विभागीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) उभारण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवडसह मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे निवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे. शहरामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. हे वसतिगृह सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बांधले जाईल, असे चाबुकस्वार सांगितले.

Web Title: Five thousand constructions of MIDC will be regular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.